Rumdamol Davorlim Cross Damaged: रूमडामळ-दवर्ली येथे मागील काही दिवसांपासून, हिंदू-मुस्लिम वादामुळे तणाव निर्माण झाला आहे.
त्यात आता सोमवारी संध्याकाळी येथे काही तरूणांनी क्रॉसची मोडतोड केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. तीन तरूण क्रॉसची मोडतोड करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
रूमडामळ येथील वातावरण मागील काही दिवसांपासून तणावग्रस्त आहे. णशात पोलिसांकडून येथे गस्त घालून काही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
दरम्यान, सोमवारी सांयकाळी घडलेल्या या घटनेमुळे या भागात पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्हायरल व्हिडिओ काय आहे?
क्रॉसची मोडतोड करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात तीन तरूण क्रॉसची मोडतोड करताना दिसत आहेत. यात तरूण क्रॉसवरती उड्या घेत त्याची तोडफोड करताना दिसत आहेत.
पोलिसांत तक्रार दाखल
रूमडामळ-दवर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच विनायक वळवईकर यांनी या प्रकरणी मायना कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रूमडामळ दवर्ली येथील क्रॉसची मोडतोड केल्याची घटना समोर आली आहे.
याचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध असून, पोलिसांनी व्हिडिओ दिसणाऱ्या तिघांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी वळवईकर यांनी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.