Ponda Wildlife Corridor Dainiak Gomantak
गोवा

Ponda Wildlife Corridor: फोंड्यात वन्यप्राण्यांसाठी ‘कॉरिडॉर’ उभारा; नागरिकांची मागणी: अपघातात वाढ, शहरातही वाढला वन्यप्राण्यांचा वावर

Ponda City Leopards Straying Into: चारी बाजूंनी डोंगरदऱ्या आणि त्यात विसावलेला हा फोंडा तालुका. त्यामुळे वन्यप्राण्यांचे प्रभावी अस्तित्व या तालुक्यात जाणवते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: चारी बाजूंनी डोंगरदऱ्या आणि त्यात विसावलेला हा फोंडा तालुका. त्यामुळे वन्यप्राण्यांचे प्रभावी अस्तित्व या तालुक्यात जाणवते. पूर्वी वन्य प्राणी हे केवळ फोंड्याच्या डोंगरदऱ्यात दिसायचे. पण आता हे वन्य प्राणी पाणी आणि भक्ष्याच्या शोधात चक्क फोंडा शहरात यायला लागले आहेत, त्यामुळेच या वन्य प्राण्यांसाठी ‘कॉरिडॉर'' उभारण्याची मागणी जोर धरत आहे.

फोंड्याच्या महामार्गावर काही ठिकाणी या वन्य प्राण्यांचे ‘क्रॉसिंग'' असते. त्यासंबंधीचे सूचना फलकही महामार्गांवर लावले आहेत. पण चौपदरी रस्त्याच्या कामामुळे आणि बगल रस्ते उभारताना मोठ्या संरक्षक भिंती उभारल्याने या वन्य प्राण्यांना रस्ता पार करणे अशक्य ठरत आहे. पूर्वी बिबटे, गवे रेडे तसेच सांबर, हरीण आदी रानटी जनावरे बिनधास्त लोकवस्तीच्या बाहेरील रस्ता आरपार करताना दिसायचे. पण आता हे बंदच झाले आहे, कारण चौपदरी बांधताना आवश्‍यक जागाच या वन्य प्राण्यांसाठी राखीव ठेवलेली नसल्याने आता कॉरिडॉरची मागणी जोर धरत आहे.

ब्लॅक पँथरही मृत्युमुखी!

आठ महिन्यांपूर्वी कोने - प्रियोळ भागातील मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळेला एक ब्लॅक पँथर मृतावस्थेत सापडला होता. रात्रीच्या वेळेला रस्‍ता पार करताना एखाद्या वाहनाच्या ठोकरीमुळे तो गतप्राण झाला हे स्पष्ट झाले होते. यापूर्वी दोन बिबटेही फोंडा तालुक्यातील रस्त्यांवर असेच मृत झाले होते. त्यामुळे फोंडा तालुक्यात कायम वन्यप्राण्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय पाहिजे वन्य प्राण्यांना!

रस्त्यांवर वन्य प्राण्यांना कॉरिडॉर

रस्त्याच्या कडेला असलेल्या रानात ऐन उन्हाळ्यात पाण्याचे उघडे कुंभ

ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा जास्त वावर आहे त्या जागा आरक्षित करणे

वन्य प्राणी ऐन उन्हाळ्यात पाणी आणि भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीत येतात. राने वने नष्ट केल्यामुळे आणि लोकच आता रानात प्लॉट पाडून घरे बांधत असल्याने या प्राण्यांनी जायचे तरी कुठे, हा सवाल आहे.

- संदीप पारकर

(आरटीआय कार्यकर्ता, खांडेपार)

वन्य प्राण्यांना रस्त्यांवर आवश्‍यक त्या ठिकाणी कॉरिडॉर उभारण्याची आवश्‍यकता आहे. चौपदरी मार्ग बांधताना कोणतेही नियोजन केले नसल्याने वन्य प्राण्यांची गोची होत आहे. रस्ता पार करणे या प्राण्यांना शक्य होत नसल्याने त्यांची अचडण होते.

- विराज सप्रे

(आरटीआय कार्यकर्ता, फोंडा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT