Electricity  Dainik Gomantak
गोवा

Ponda News : वर्षभरात फोंडा तालुका भूमिगत वीजवाहिनी युक्त!

वीजमंत्री ः सरकारी कार्यालये सौर ऊर्जेवर

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News: राज्यातील वीज ग्राहकांना सुरळीत आणि व्यवस्थित वीजपुरवठा व्हावा,यासाठी वीज खाते कार्यरत असून विविध ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.

या कामाचा एक भाग म्हणून येत्या वर्षभरात फोंडा तालुका पूर्णपणे भूमिगत वीजवाहिन्यांनी युक्त केला जाईल, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील सर्व सरकारी कार्यालये सौर ऊर्जेने जोडली जाणार असल्याचेही ढवळीकर यांनी नमूद केले.

कुंडई येथे औद्योगिक वसाहतीत आज (रविवारी) वीज खात्यातर्फे कुर्टी ते कुंडई व पुढे बाणस्तारी ते माशेलपर्यंतच्या भूमिगत वीजवाहिन्या तसेच अन्य सुधारणांसह सुरळीत वीज पुरवठ्यासंंबंधीच्या योजनेचा शुभारंभ वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड,जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, कुंडईचे सरपंच सर्वेश जल्मी तसेच इतर सर्व पंचसदस्य,वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस, वरिष्ठ अभियंता राजीव सामंत व सुरेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

ढवळीकर म्हणाले की, लोकांची कामे करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. मुळात वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कार्यरत रहायला हवे, चांगले ते देण्याचा आपला प्रयत्न आहे.

त्यांना समज द्या !

वीज खात्यात अनेक कामचुकार अभियंते आहेत. त्यांना कुणाशीही देणेघेणे नाही.पगार मिळाला की बस्स, असा त्यांचा दृष्टिकोन असतो.सरकारी कर्मचारी म्हणजे आपण जनतेचे सेवक आहोत,याचा त्यांना विसर पडतो, असे सांगून एका टोपलीत जर एक नासका आंबा असेल तर सबंध टोपली खराब करतो, त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज द्यायला हवी,प्रसंगी कारवाईही करावी.सरकारमधील सर्वोत्कृष्ट ,असे वीज खाते असल्याचे दाखवून द्या, असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT