Ponda News : नागेश फडते यांनी पक्षकार्यात सेवाभाव जपला !

मान्यवरांच्या भावना : फोंड्यात अमृतमहोत्सवी वाढदिन उत्साहात साजरा
shripad naik
shripad naikDainik Gomantak

Ponda News : नागेश फडते यांनी पक्षासाठी काम करताना केवळ सेवाभाव जपला. अशा कार्यकर्त्यांमुळेच भाजप आज मोठा झाला आहे, असे उद्‍गार भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते नागेश नारू फडते यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिन सोहळ्यावेळी मान्यवरांनी काढले. फर्मागुढीत शनिवारी फडते यांचा हा जाहीर वाढदिन सोहळा पार पडला.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कृषिमंत्री रवी नाईक, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. मनोहर आडपईकर, एनआरआय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, डॉ. गोविंद काळे तसेच सत्कारमूर्ती नागेश फडते व सौ. फडते आदी उपस्थित होते.

मनोहर आडपईकर, नरेंद्र सावईकर, रितेश नाईक, गोविंद काळे तसेच मिलिंद म्हाडगूत, अनंत नाईक व इतरांनी आपले विचार व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना फडते यांनी सेवा कार्य हे पूर्वसंचित असते आणि आपण जे काही केले ते पूर्वसंचित होते, त्यामुळेच आपल्याला सर्वांचे प्रेम मिळाले असे नमूद केले. यावेळीफडते यांच्या त्यांचे समर्थक, विद्यार्थी वर्ग व हितचिंतकांतर्फे सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले.

‘आई’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

नागेश फडते यांच्या ‘आई‘ या कविता संग्रहाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह मंत्री रवी नाईक, मंत्री सुभाष शिरोडकर व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हिंदी, मराठी आणि कोकणी अशा तीन भाषांत हा कविता संग्रह असून आपल्या आईच्या प्रती भावना व्यक्त करताना फडते यांनी सुरेख कविता साकारल्या आहेत. विशेषतः वडिल वारल्यानंतर त्यांच्या आईनेच आम्हा भावंडांना काबाडकष्ट करून मोठे केले, असे नागेश फडते यांनी सांगितले.

मंत्र्यांकडून शुभेच्छा

मुख्यमंत्री सावंत यांनी शुभेच्छा देत फडते यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बळावरच राज्यात आणि देशात भाजपाचे स्थान कायम जनमानसात राहील, असा विश्‍वास व्यक्त केला.

राजकारणात आपल्याला फडते यांनी समर्थ साथ दिल्याचे श्रीपाद नाईक सांगत त्यांच्याबद्दलच्या राजकीय वाटचालीबद्दल अनेक आठवणी सांगितल्या.

shripad naik
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ घट; वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

रवी नाईक म्हणाले की, ‘फडते यांनी स्वतःच्या हिताकडे न पाहता पक्ष आणि लोकांसाठी काम केले. त्यामुळेच त्याची दखल आज जनमानसाने घेतली असून असे कार्यकर्ते पुढील काळात तयार व्हायला हवेत.’

सुभाष शिरोडकर यांनी फडते यांच्या समर्पित भावनेने कार्य करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी माणसे जोडली असे सांगताना असे कार्यकर्ते पक्ष घडवतात, म्हणून युवावर्गाने त्यांचा आदर्श घ्यावा, असे सांगितले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com