Ponda Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: गॅस चोरीचा छडा लावताना पोलिसांच्या हाती लागले चोरट्यांचे टोळके; मंदिर आणि घरफोडी घटनांची दिली कबुली

Ponda Police: गॅस सिलिंडरसह इतर अनेक वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. गुरुवारी या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सर्वांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दोन गॅस सिलिंडर चोऱ्यांचा छडा लावताना फोंडा पोलिसांच्या हाती चोरट्यांचे टोळकेच हाती लागले असून या टोळक्याने चोरलेल्या गॅस सिलिंडरसह इतर अनेक वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. गुरुवारी या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सर्वांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

कासारवाडा-बेतोडा येथील एका भाड्याच्या खोलीचा दरवाजा तोडून आतील गॅस सिलिंडर चोरल्याची तक्रार मलिक लवार याने फोंडा पोलिसांत गेल्या बुधवारी २५ रोजी दिली होती. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी संशयित म्हणून शुभम भानू गावकर (बेतोडा) याला ताब्यात घेतले. शुभम गावकर याच्याकडे चौकशी करताना त्याने आपला अन्य एक साथीदार विश्‍वेश आनंद सालेलकर (बेतोडा) याचे नाव सांगितल्याने त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असता, चोरीची पुष्टी मिळाली.

दरम्यान, काल गुरुवारी प्रेमानंद गावकर याने आपल्या घरातील गॅस सिलिंडर चोरीची तक्रार फोंडा पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देताना रजत श्रीकांत नाईक (बेतोडा), देवसरन शाम कार्तिक आगरिया या मूळ मध्यप्रदेश येथील पण सध्या बेतोडा येथे राहणाऱ्या तसेच महंमद जानू खान अली मूळ उत्तर प्रदेश येथील पण सध्या बेतोडा येथे राहणाऱ्या अशा तिघांना ताब्यत घेतले असता, या पाचही जणांच्या टोळीकडून फोंडा तसेच राज्यात इतर अनेक ठिकाणी मंदिर तसेच घरफोडी केल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, संशयित विश्‍वेश सालेलकर याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे. इतरांची पोलिस चौकशी करीत असून इतर ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणांचा संबंध या टोळीकडे आहे काय, या अनुषंगाने तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर तसेच पोलिस उपअधीक्षक अर्शी आदिल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संकेत तळकर, सुशांत गावकर, हेडकॉन्स्टेबल केदारनाथ जल्मी, कॉन्स्टेबल अमेय गोसावी, अदित्य नाईक यांच्या पथकाने या चोरट्यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

Bangladesh Violence: पेट्रोलचे 5 हजार मागितले अन् हिंदू तरुणाला कारखाली चिरडले, BNP नेत्यानं घेतला जीव; बांगलादेशात पुन्हा रक्ताची होळी

म्हादई अभयारण्यात कोत्राच्या नदीपात्रातून, पाच-सहा किमी डोंगर दऱ्या पार करून 'सिद्धेश्‍वराच्या गुंफे'कडे पोहोचता येते..

Goa Nightclub Fire: 25 जणांचा बळी गेला, 40 दिवस उलटले; मुख्य सूत्रधार अजूनही गुलदस्त्यात, जबाबदारी एकामेकांवर ढकलण्‍याची संगीत खुर्ची

SCROLL FOR NEXT