Bison In Goa Ponda, Gaur in Goa Ponda Dainik Gomantak
गोवा

Bison In Ponda: ..महामार्गावर आला भला मोठा गवा! दुचाकीस्वारांची भीतीने गाळण; फोंडा परिसरात वाढला वावर

Bison sighting goa: राने वने सोडून आता जंगली प्राणी शहरात भटकू लागले आहेत. माणसांनीच राने बेचिराख केल्यामुळे या प्राण्यांना आता आपल्या भक्ष्यासाठी लोकवस्तीत धाव घ्यावी लागत आहे.

Sameer Panditrao

फोंडा: राने वने सोडून आता जंगली प्राणी शहरात भटकू लागले आहेत. माणसांनीच राने बेचिराख केल्यामुळे या प्राण्यांना आता आपल्या भक्ष्यासाठी लोकवस्तीत धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे बिबटे, गवे, रान डुक्कर, मगरी आणि इतर प्राणी भर शहरात भटकू लागले आहेत.

फोंडा ते पणजी महामार्गावरील फर्मागुढी येथे महामार्गावर चक्क एक भला मोठा गवा काल अचानक रस्ता पार करताना दिसल्याने घाबरलेल्या वाहनचालकांना वाहने थांबवावी लागली.

फर्मागुढीतील रस्त्यावर दुपारी एक भला मोठा गवा आरामात रस्ता पार करताना दिसल्याने विशेषतः दुचाकीस्वारांची भीतीने गाळण उडाली. गवा थांबलेल्या वाहनांच्या रांगांतून वाट काढत रस्त्याच्या पलीकडे असलेल्या झाडीत गेला आणि गायब झाला.

फोंडा शहरात अलीकडच्या दिवसांत सातत्याने गव्यांचा वावर दिसू लागला आहे. फोंडा शहर परिसर ते ढवळी, कुर्टी आणि आता फर्मागुढी अशा मोक्याच्या ठिकाणी गवे बिनधास्त संचार करू लागल्यामुळे अनेकांची भीतीने गाळण उडाली आहे. कुर्टी येथे तर रात्रीच्या वेळेला चार गवे फिरताना आढळले. या परिसरात एक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय आहे.

ढवळीतील मुख्य रस्त्यावरही गेल्या महिन्यात एक भला मोठा गवा फिरताना आढळला होता. गव्यांचा कळपच फोंडा भागात भटकत असल्याचे यामुळे सिद्ध झाले असून संबंधितांनी या गव्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

कुर्टीत आढळताहेत मगरी...

कुर्टी भागातील नाल्यांत चक्क भल्या मोठ्या मगरी आढळत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात तर या मगरी नाल्याच्या कडेवर पहुडलेल्या आढळल्या होत्या. कुर्टीतील महादेव मंदिराजवळील नाल्यात तसेच कवळे नाल्यातही या मगरी दिसल्या आहेत.

म्हार्दोळ-मडकई परिसरात बिबटे!

फोंडा भागात गवे फिरताना आढळत आहेत, तर मागच्या काही काळापासून म्हार्दोळ आणि मडकई परिसरात बिबटे आढळत आहेत. म्हार्दोळ भागात यापूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला होता. मडकई - कुंडई भागातील रस्त्यावर तर बिबट्यांच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या, अलीकडच्या काळात त्या बंद झाल्या आहेत. मात्र, येथून रात्रपाळीला जाणाऱ्या कामगारांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025 Semifinal: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास 'या' संघाला मिळणार फायनलचं तिकीट, नियम वाचा

Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

Bihar Elections: "मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील..." विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

SCROLL FOR NEXT