VIDEO: शत्रुराष्ट्रात घुमला 'जन गण मन'चा आवाज! पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी गायलं भारताचं राष्ट्रगीत; व्हायरल व्हिडिओवरुन खळबळ

Pakistan University Indian National Anthem: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातून एक अशी घटना समोर आली, ज्याने सध्या सोशल मीडियावर आणि दोन्ही देशांच्या राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली.
Pakistani Students Viral Video
Pakistani Students Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Bacha Khan University Controversy: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातून एक अशी घटना समोर आली, ज्याने सध्या सोशल मीडियावर आणि दोन्ही देशांच्या राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. येथील 'बाचा खान' विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' गायल्याने नवा वाद निर्माण झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हे संपूर्ण प्रकरण चरसड्डा येथील बाचा खान विद्यापीठातील दोन दिवसीय 'कॅम्पस एक्सपो' किंवा 'युथ फेस्टिव्हल' दरम्यान घडले. विद्यापीठाच्या फार्मसी विभागात शिकणाऱ्या जिब्रान रियाज नावाच्या एका विद्यार्थ्याने व्यासपीठावरुन अत्यंत उत्साहात भारताचे राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, राष्ट्रगीत सुरु असताना तिथे उपस्थित असलेल्या इतर काही विद्यार्थ्यांनीही त्याला साथ दिली आणि जोरात घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पाकिस्तानमध्ये (Pakistan) तीव्र संताप व्यक्त केला जात असून अनेकांनी याला 'देशद्रोही' कृत्य असल्याचे म्हटले.

Pakistani Students Viral Video
India Pakistan Water Dispute: "आम्ही उत्तरासाठी बांधील नाही" सिंधू जल करारावर भारताचं 'नो कॉम्प्रमाईज' धोरण; पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर

सोशल मीडियावर (Social Media) या व्हिडिओवरुन आता दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी नेटकऱ्यांचा एक मोठा वर्ग या विद्यार्थ्यावर आणि विद्यापीठ प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे. त्यांच्या मते, विद्यापीठ कॅम्पसमध्ये अशा प्रकारे दुसऱ्या देशाचे राष्ट्रगीत गाणे हे राष्ट्रीय अस्मितेचा अपमान आहे. काही युजर्सनी याला 'राष्ट्रविरोधी' कृत्य ठरवले असून अशा घटनांमुळे विद्यापीठाच्या प्रतिमेला तडा गेल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे, काही उदारमतवादी युजर्सनी याकडे केवळ एक सांस्कृतिक देवाणघेवाण किंवा मनोरंजनाचा भाग म्हणून पाहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही घटना पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

Pakistani Students Viral Video
India vs Pakistan: हाय-व्होल्टेज क्लॅश, आज भारत- पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! कुठे अन् किती वाजता पाहता येणार सामना?

या वादानंतर विद्यापीठ प्रशासनाची भूमिकाही संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे. एका शैक्षणिक संस्थेत अशा प्रकारचा कार्यक्रम होत असताना तिथे कोणाचेही लक्ष कसे गेले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीत हे प्रकरण केवळ एका विद्यार्थ्याच्या हौसेपुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय वादाचा विषय बनले आहे. यावर आता सरकार किंवा विद्यापीठ प्रशासन काय अधिकृत भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com