PM Kisan: शेतकऱ्यांची होळी होणार गोड! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 'पीएम किसान'चा 22 वा हप्ता; तारीख आली समोर

PM Kisan 22nd Installment Update: केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि शेतकरी वर्गासाठी आधारवड ठरलेली 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' (PM-Kisan) योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
PM Kisan 22nd Installment Update
PM Kisan 22nd Installment UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि शेतकरी वर्गासाठी आधारवड ठरलेली 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' (PM-Kisan) योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशभरातील करोडो शेतकरी सध्या आपल्या हक्काच्या २२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. वर्षातून तीन वेळा मिळणारी २-२ हजार रुपयांची ही आर्थिक मदत छोट्या शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे आणि खतांच्या खर्चासाठी मोठा दिलासा ठरते. आतापर्यंत या योजनेचे २१ हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आले असून, आगामी हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.

होळीपूर्वी मिळणार आनंदाची बातमी

१९ नोव्हेंबर २०२५ रोजी सरकारने २१ व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले होते. नियमानुसार, चार महिन्यांच्या अंतराने मिळणारा हा हप्ता आता जवळ आला आहे. विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सरकार आगामी होळीच्या सणापूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची दाट शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी २०२६ नंतर कधीही २२ व्या हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते. अद्याप अधिकृत तारखेची घोषणा झाली नसली, तरी जुन्या नोंदी आणि सणासुदीचा काळ पाहता फेब्रुवारीअखेर शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होऊ शकते.

४,००० रुपये कुणाला मिळणार?

यावेळी एका विशेष चर्चेने जोर धरला आहे, ती म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यात चक्क ४,००० रुपये जमा होणार आहेत. मात्र, हे कोणतेही बोनस नसून तांत्रिक कारणास्तव रखडलेले पैसे आहेत.

ज्या पात्र शेतकऱ्यांचा २१ वा हप्ता कागदपत्रांच्या त्रुटीमुळे किंवा बँक लिंक नसल्यामुळे अडकला होता, आणि ज्यांनी आता ही चूक सुधारली आहे, अशा शेतकऱ्यांना मागील हप्ता (२,००० रुपये) आणि चालू हप्ता (२,००० रुपये) असे एकत्रित ४,००० रुपये मिळणार आहेत. ज्यांचे सर्व व्यवहार सुरळीत आहेत, त्यांना नेहमीप्रमाणे २,००० रुपयेच मिळतील.

PM Kisan 22nd Installment Update
Goa Crime: "तुम्ही अश्लील कंटेंट शेअर केलाय..." सायबर भामट्याची धमकी ठरली जीवघेणी; छळाला कंटाळून वास्कोतील वृद्धाची आत्महत्या

ई-केवायसी (e-KYC) नसेल तर पैसे मिळणार नाही

या योजनेचा लाभ घेताना पारदर्शकता असावी, यासाठी सरकारने 'ई-केवायसी' अनिवार्य केली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकरी स्वतः 'पीएम किसान' पोर्टलवर जाऊन ओटीपी (OTP) द्वारे किंवा जवळच्या 'सीएससी' (CSC) केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने काम पूर्ण करू शकतात. नवीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनीही त्यांचे सत्यापन वेळेत करणे गरजेचे आहे.

PM Kisan 22nd Installment Update
Goa Street Race: ‘गोवा स्ट्रीट रेस’मध्ये 3 अपघात! नियोजनात त्रुटी; विदेशी पर्यटकांचा अल्प प्रतिसाद

घरबसल्या तपासा तुमचे नाव आणि स्टेटस

हप्ता जमा होण्यापूर्वी तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे तपासणे सोपे झाले आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा. तेथे 'Know Your Status' या पर्यायावर क्लिक करून आपला नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि कॅप्चा कोड भरा. 'Get Data' वर क्लिक करताच तुमच्या खात्याची सविस्तर माहिती समोर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com