Ritesh R Naik Dainik Gomantak
गोवा

Ritesh Naik Resign: कृषीमंत्र्यांचे सुपुत्र रितेश नाईक यांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामा

गोमन्तक डिजिटल टीम

फोंड्याचे आमदार कृषीमंत्री रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक यांनी अखेर नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अलिखीत करारनुसार रितेश यांचा एका वर्षाचा कार्यकाळ संपूनही ते पदावर कायम असल्याने सत्ताधारी नगरसेवक गेले काही दिवस नाराज होते. सुत्रांच्या माहितीनुसार रितेश नाईक यांनी पालिका संचालनालयाकडे राजीनामा सादर केला आहे.

एप्रिल 2022 मध्ये फोंडा पालिकेच्या माजी नगराध्यक्ष गिताली तळावलीकर आणि उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध आणलेला अविश्‍वास ठराव 8 मार्च रोजी शुक्रवारी 9 विरुद्ध 0 मतांनी संमत झाला होता. त्यानंतर कृषीमंत्री रवी नाईक यांचे सुपूत्र रितेश नाईक यांची फोंड्याच्या नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

तर, अर्चना डांगी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. अलिखीत करारानुसार रितेश यांच्याकडे केवळ एकच वर्ष नगराध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यापेक्षा अधिककाळ झाल्याने काही नगरसेवक नाराज असल्याची फोंडा राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान, फोंडा पालिका नगराध्यपदाची जबाबदारी संभाळल्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये सुरुवातीच्या सहा महिन्यातच नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. पंधरापैकी आठ नगरसेवकांनी हा अविश्‍वास ठराव दाखल केला.

मात्र, त्यातील एक नगरसेवक गैरहजर राहिल्याने सातच संख्याबळ उरले. त्यामुळे ठराव बारगळल्यात आला. अविश्‍वास ठराव आणलेल्यांत मगो समर्थक नगरसेवक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT