Ponda Municipal Council Elections Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Council Elections 2023: ‘बिनविरोध’ तरीही चर्चेत असलेला प्रभाग-13; काही कामे पूर्ण, काही प्रलंबित

नूतन नगरसेवकासमोर कामे पूर्णत्वास नेण्याचे असेल आव्हान

दैनिक गोमन्तक

Ponda Municipal Council Elections 2023: राजीव गांधी कला मंदिरनंतरच्या कीर्ती हॉटेलपासून प्रभाग क्र. 13 सुरू होतो. हा प्रभाग गुरुकुल, भोलानाथ हॉल करत करत कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे.

या प्रभागात दोन्ही बाजूच्या चढावावर वसलेल्या अनेक को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी पाहायला मिळतात.

एकीकडे फोंड्याहून बेतोडा-निरंकाल येथे जाणारा मुख्य रस्ता तर दुसऱ्या बाजूला हाउसिंग सोसायटीची दाट वस्ती, असे दृश्य इथे बघायला मिळते.

सध्या या प्रभागातील उमेदवार बिनविरोध निवडून आलेला असल्यामुळे इथे पालिका निवडणूक होणार नाही. असे असूनही हा प्रभाग सध्या चर्चेत आहे.

या प्रभागात डॉ. केतन भाटीकरांच्या ‘रायझिंग फोंडा’तर्फे रिंगणात उतरलेल्या विद्या पुनाळेकर व भाजप पॅनेलच्या दर्शना नाईक यांच्यात थेट लढत होती. पण अर्ज मागे घेण्याच्या दिवशी घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे येथील चित्र बदलले.

पक्ष व भाटीकरांशी प्रामाणिक

यावेळी अमिना नाईक या कोणत्याही प्रभागातून रिंगणात उतरल्या नाहीत. प्रभाग १० हा इतर मागासवर्गीय महिलांकरता आरक्षित झाल्यामुळे तसेच तो प्रभाग १३ ला जवळ असल्यामुळे तिथून अमिना रिंगणात उतरतील असा कयास व्यक्त होत होता.

पण काही कारणास्तव त्यांची वर्णी लागली नाही. असे असले तरी आपण रायझिंग फोंडाचे प्रमुख डॉ. केतन भाटीकर व मगो पक्षाशी प्रामाणिक असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या मागील विजयात डॉ. भाटीकर व नवनिर्वाचित नगरसेविका विद्या पुनाळेकर यांचा सिंहाचा वाटा होता, असे त्या म्हणाल्या.

नगरसेवकांसमोर आव्हाने

अमिना यांना गेल्या पालिका निवडणुकीत 445 मते मिळाली होती. एकंदरीत या प्रभागाच्या नवीन नगरसेवकासमोर अनेक आव्हाने आहेत.

या प्रभागात काँग्रेस तसेच मगो पक्षाची कार्यालये असल्यामुळे पक्षीय राजकारणाच्या दृष्टीनेही या प्रभागाला महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या प्रभागातून मगो पक्षाला सर्वाधिक मते (305५) प्राप्त झाली होती.

अश्रू’ हा कळीचा मुद्दा

अर्ज मागे घेण्याची दिवशी भाजप पॅनेलच्या उमेदवार दर्शना नाईक यांनी रिंगणातून माघार घेणे, अनेकांना खटकत आहे.

माघार घेताना त्यांच्या डोळ्यांत आलेल्या ‘अश्रूंची’ चर्चा प्रभागात सुरू असल्याचे बघायला मिळाले. अश्रू पुसले गेले असले तरी या अश्रूंची झालेली फुले या निवडणुकीत कोणावर बरसतात आणि कोणावर बसतात हे लवकरच कळून येणार आहे.

पुनाळेकर भाजपात : विद्या पुनाळेकर या याच प्रभागातून 2013 साली नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.

पण गेल्या खेपेला हा प्रभाग इतर मागासवर्गीय महिलांकरता आरक्षित झाल्यामुळे विद्या यांचा पत्ता कट झाला होता. त्यांच्या जागी अमिना नाईक यांची रायझिंग फोंडाच्या उमेदवार म्हणून वर्णी लागली होती.

आणि अमिनानेही एकतर्फी विजय प्राप्त करून ही वर्णी सार्थकी लावली होती. आता परत हा प्रभाग खुला झाल्यामुळे रायझिंग फोंडाने परत एकदा विद्या यांनाच रिंगणात उतरवले होते.

पण त्या आता बिनविरोध निवडून येऊन भाजपमध्ये गेल्यामुळे रायझिंग फोंडा व मगोपासून दूर गेल्या आहेत. विद्या या केवळ रायझिंग फोंडाच्याच नव्हे तर मगो पक्षाच्याही खंद्या कार्यकर्त्या म्हणून गणल्या जात होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT