Ponda Muncipal Council Election 2023 | Vishwanath Dalavi  Dainik Gomantak
गोवा

Ponda Muncipal Council Election 2023: फोंड्यात माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी बिनविरोध

विरोधातील उमेदवाराने घेतली माघार; कार्यकर्त्यांचा जल्लोष

Akshay Nirmale

Ponda Muncipal Council Election 2023: फोंडा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच येथील एक महत्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे.

आज, गुरूवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी भारत पुरोहित यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या विजयामुळे विश्वनाथ दळवी यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. ते तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

फोंडा आणि साखळी येथील नगरपालिकेसाठी 5 मे रोजी मतदान होत आहे तर मतमोजणी 7 मे रोजी असणार आहे. तथापि, आज, गुरूवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे.

बुधवारी छानणीनंतर दोन्ही नगरपालिकांसाठी एकूण 108 अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते. एकूण दाखल झालेले सर्व 118 अर्ज वैध ठरले होते पण काही उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले होते.

त्यामुळे असे 10 अर्ज बाजूला काढण्यात आले. ग्राह्य 118 अर्जांपैकी फोंड्यातील 52 तर सांखळीतील 56 अर्ज वैध आहेत.

दरम्यान, फोंड्यातून आता एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. दळवी यांच्या विरोधातील भारत पुरोहित यांनी गुरूवारी अर्ज मागे घेतल्यानंतर दळवी यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

दळवी यांना पुष्पहार घालून त्यांना खांद्यावर उचलून घेऊन कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. दळवी हे फोंड्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. दरम्यान, फोंड्यात एकूण 15 प्रभाग असून साखळीत 12 प्रभाग आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT