Goa News|Heavy Loaded Truck Dainik Gomantak
गोवा

Truck Terminal: फोंड्यात शेकडो वाहनांची ये-जा, पार्किंगसाठी जागाच नाही; टर्मिनलच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष

Ponda Truck Transporters: ट्रक टर्मिनल उभारावे अशी मागणी लोरी असोसिएशनतर्फे वारंवार करीत आहे परंतु आजवर याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष दिलेले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: फोंडा तालुक्यात कुंडई, उसगाव, बेतोडा व मडकई या औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहनांची ये जा सुरू असते. या वाहनांसाठी ट्रक टर्मिनलची सोय नसल्याने कुठेही उभी केली जातात. त्यामुळे होणारे अपघात तसेच अस्वच्छता आदी प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या ठिकाणी ट्रक टर्मिनल उभारावे, अशी मागणी लोरी असोसिएशनतर्फे वारंवार करीत आहे, परंतु आजवर याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

कुर्टी, ढवळी, बेतोडा, उसगाव आदी भागात रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात मालवाहू अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे अनेकदा रहदारीलाही समस्या निर्माण होते. कुर्टी, ढवळी व बेतोडा बगल उभी करण्यात येणारी अवजड वाहने तर वाहतुकीला त्रासदायक ठरत आहेत. या वाहनांमुळे अनेक अपघात घडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच या वाहनांमुळे स्वच्छतेचा प्रश्‍नही निर्माण होत आहे. चालक व वाहक उघड्यावर अंघोळ करावी लागत आहे.

फोंड्यात ३०० वाहतूक कार्यालये

ट्रक टर्मिनल नसल्याने या मालवाहू वाहनांचे नियंत्रण करणाऱ्या ठेकेदारांनी येथील प्रमुख रस्त्यांच्या बाजूला जागा मिळेल तिथे आपली कार्यालये थाटली आहेत. सुमारे ३०० हून कार्यालये या भागात आहेत. यांपैकी अनेक कार्यालये बेकायदा आहेत.

संजीवनीच्या जागेत ट्रकांचे पार्किंग

संजीवनी साखर कारखान्याच्या जागेत मालवाहू वाहनांसाठी पे पार्किंग सुविधा उपलब्ध केली आहे. दोन वर्षांपूर्वी सरकारने संजीवनी साखर कारखान्याची २ लाख चौरस मीटर जागा ट्रक पार्किंगसाठी देण्याची प्रक्रिया सुरु केली होती, संबंधित खात्याने ही प्रक्रिया पूर्ण करून एक सुसज्ज ट्रक टर्मिनल उभारावे, असे नागराज नायडू यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT