Goa Burning Truck: गोव्यातून बंगळूरकडे जाणाऱ्या ट्रकने अनमोड घाटात घेतला पेट

सुदैवाने जीवीतहानी नाही
Goa Burning Truck
Goa Burning TruckDainik Gomantak

Fire in Goa: गोव्यातून बंगळूरला जाणाऱ्या एका ट्रकने अनमोड घाटात अचानक पेट घेतला. सुदैवाने ट्रकमधील ड्रायव्हर आणि इतर हे आगीने मोठे रूप घेण्याआधीच ट्रकमधून बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

Goa Burning Truck
Mahadayi Water Dispute : म्हादई प्रश्नात गोवा सरकारकडून न्याय मिळणार याची खात्री; अँथनी बार्बोजा यांचे वक्तव्य

टाटा कंपनीचा हा ट्रक (KA 22 D 1544) आहे. गोव्यातून सोमवारी रात्री हा ट्रक बंगळूरच्या दिशेने जात होता. यावेळी अनमोड घाट चढताना ट्रकचे इंजिन गरम झाले होते. कर्नाटक हद्दी आरटीओ तपासणी नाक्याजवळ ट्रकने अचानक पेट घेतला.

त्यानंतर ट्रकचालक आणि इतरांनी आजूबाजूच्या झाडांच्या लहान फांद्या तोडून त्याद्वारे ट्रकची आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत आग भडकली. त्यानंतर अग्निशमन दलाला फोन लावण्यात आला.

आग लागलेल्या ट्रकपासून गोवा जवळ अस्लयाने हा फोन गोवा अग्निशमन दलाला गेला. गोवा अग्निशमन दल आग विझविण्यासाठी जायलाही निघाले. परंत ही घटना कर्नाटक हद्दीत घडल्याने राज्याच्या नियमांनुसार त्यांना घटनास्थळी येण्याचा परवाना मिळाला नाही.

त्यामुळे पुन्हा कर्नाटकातील खानापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतू तोवर ट्रक जळून खाक झाला होता. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास लागलेली आग पहाटे चार पर्यंत धुमसत होती.

पहाटे चार वाजता खानापूर येथील अग्निशमन दलाचा पाण्याचा बंब घटनास्थळी पोहचला. पण तोपर्यंत ट्रकचे नुकसान झाले होते. हा ट्रक लोंढा येथील अल्ताफ बंकापुरे यांच्या मालकीचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com