drunk father arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: घृणास्पद! दारूच्या नशेत 14 वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधम पित्याला अटक

Ponda Goa molestation case: दारूच्या नशेत माणूस किती खालची पातळी गाठू शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय बोरी येथे आला आहे

Akshata Chhatre

फोंडा: दारूच्या नशेत माणूस किती खालची पातळी गाठू शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय बोरी येथे आला आहे. स्वतःच्याच अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका नराधम पित्याला अटक केली आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला हा इसम सध्या आवेडे-बोरी येथे वास्तव्यास होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नशेच्या आहारी जाऊन घडले कृत्य

ही धक्कादायक घटना मंगळवारी, २३ तारखेला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेवेळी संशयिताची पत्नी आपल्या गावी उत्तर प्रदेशात गेली होती. याच संधीचा फायदा घेत पित्याने दारूच्या नशेत आपल्या १४ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मुलीने धाडसाने प्रतिकार केला आणि तेथून पळ काढला.

मुलीने शाळेतील शिक्षिकेला सांगितला प्रकार

या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन एका समुपदेशकाला (कौन्सिलर) हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तात्काळ तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपी पित्याला अटक केली आहे. फोंडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT