Ponda Fish Market Dainik Gomantak
गोवा

Ponda Fish Market: 'आजच दुकाने खाली करा'! पालिकेमुळे फोंडा मासळी मार्केटमधील व्यापाऱ्यांचा गोंधळ; मुख्यमंत्र्यांचे सहकार्य

Ponda Old Fish Market: मुख्यमंत्र्यांनी अकरा दिवसांच्या गणेश चतुर्थीपर्यंत दुकाने हलवण्यास देणार नाही, असे आश्‍वासन दिल्यानंतर व्यापारी परतले. यावेळी रायझिंग फोंड्याचे नेते डॉ. केतन भाटीकर उपस्थित होते.

Sameer Panditrao

फोंडा: धोकादायक ठरलेल्या फोंडा जुन्या मासळी मार्केट इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना गुरुवारी २१ रोजी तडकाफडकी नवीन मार्केट संकुलात स्थलांतर करण्याची ताकीद फोंडा पालिकेने दिल्यानंतर या व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांनी अकरा दिवसांच्या गणेश चतुर्थीपर्यंत दुकाने हलवण्यास देणार नाही, असे आश्‍वासन दिल्यानंतर व्यापारी परतले. यावेळी रायझिंग फोंड्याचे नेते डॉ. केतन भाटीकर उपस्थित होते.

मासळी मार्केट इमारत धोकादायक झाल्यामुळे येथील मासळी विक्रेत्यांना नवीन मार्केट संकुलातील तळमजल्यावर जागा देण्यात आली आहे. मात्र, या मासळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या सुमारे साठ व्यापाऱ्यांचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

यापूर्वीही अशीच तडकाफडकी जागा खाली करण्याची ताकीद फोंडा पालिकेने दिली होती. त्यावेळेला या व्यापाऱ्यांनी स्थानिक आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन स्थलांतर तात्पुरते पुढे ढकलले होते.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार फोंडा पालिकेने या व्यापाऱ्यांना चतुर्थीनंतर दुकाने हलवण्याची सूचना केली होती. त्यानुसार पालिकेने या व्यापाऱ्यांना जागाही दाखवली होती, सर्व व्यापारी तयार असताना अचानक ऐन चतुर्थीच्या तोंडावर पालिकेने आजच दुकाने खाली करा असा तगादा लावल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली.

सध्या हे स्थलांतर अकरा दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतर होणार असून व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चतुर्थीसाठी नवीन सामान...

या मासळी इमारतीत रेडिमेड तसेच कपडे, टेलर, पिड्डूकवाले, बांगड्यावाले व इतर दुकानदार आहेत. त्यातील बहुतांशजणांनी चतुर्थीसाठी नवीन सामान आणले आहे. सध्या चतुर्थीची लगबग सुरू आहे, त्यातच पालिकेने या व्यापाऱ्यांना स्थलांतराची सक्ती केल्यामुळे व्यापारी संतप्त बनले आणि त्यांनी केतन भाटीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शेवटी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे दुकानदारांचे स्थलांतर पुढे ढकलले गेले आहे.

मुख्यमंत्री घेणार आमदारांसोबत बैठक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पालिका मुख्याधिकारी सुयश खांडेपारकर यांना त्वरित कागदपत्रांसह बोलावले असून स्थानिक आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक, उपजिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन हा विषय सोडवण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: ड्रग्ज माफियांचा नवा ट्रेंड? QR कोडद्वारे ड्रग्जची जाहिरात? पणजी पोलीस ठाण्याजवळ आढळला बारकोड

India Forex Reserves: भारताची आर्थिक ताकद वाढली, परकीय चलन साठ्याने गाठली नवीन उंची; पाकड्यांची कंगाली पुन्हा आली जगासमोर!

Weekly Lucky Horoscope: ऑगस्टचा शेवटचा आठवडा ठरणार सुवर्णकाळ! 'या' 3 राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश मिळणार

Goa Taxi Issue: गोव्यात ओला - उबरला थारा नाहीच; 10 सप्टेंबरला जाहीर होणार टॅक्सीच्या नव्या धोरणाचा मसुदा

AUS vs SA: कांगारुंविरुद्ध लुंगी एन्गिडीचा मोठा धमाका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला जगातील चौथा गोलंदाज!

SCROLL FOR NEXT