Triple Seat Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'तुम्ही गुन्हा केला आहे', ट्रिपल सीट फिरणाऱ्या अल्पवयीन मुलांना धमकावले; उकळले पैसे; दुर्भाट परिसरात खळबळ

Ponda Durbhat Crime: मुलगा घरातून निघून गेला असून काहीतरी गैरप्रकार घडल्याचा संशय आल्याने त्याच्या आईने फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Sameer Panditrao

फोंडा: दुर्भाट परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका व्यक्तीने अल्पवयीन मुलाकडून पैशांची उकळपट्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी तिघे अल्पवयीन मुले दुचाकीवरून फिरत असताना तेथील तारकेश्‍वर नाईक यांनी त्यांना थांबवून चौकशी केली.

या वेळी नाईक यांनी मुलांपैकी एकाला पकडून “तुम्ही गुन्हा केला आहे” अशी भीती दाखवली आणि त्याच्याकडून अकरा हजार रुपयांची मागणी केली. तारकेश्‍वर यांनी धमकी देत सांगितले की, “तुझ्या मित्रांकडून प्रत्येकी साडेतीन हजार रुपये घेऊन ये, नाहीतर पोलिसांत देईन.”

या धमकीने घाबरलेल्या मुलाने मोबाईलवरून दोन हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र, आपला मुलगा घरातून निघून गेला असून काहीतरी गैरप्रकार घडल्याचा संशय आल्याने त्याच्या आईने फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून घटनेचा छडा लावला आणि संशयित तारकेश्‍वर नाईक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास फोंडा पोलिस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांनी अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket: निवृत्तीच्या वयात पदार्पण! 38 वर्षीय आफ्रिदीची कसोटी क्रिकेटमध्ये एन्ट्री

'पुलिसांक काय Value ना?", नरकासुर मिरवणुकीत आवाज वाढवला, मंडळाने घातली हुज्जत; पोलिसांनी घेतली कडक ऍक्शन

Narkasur in Goa: नरकासुर स्पर्धेत राडा! काणकोणात मिरवणुकीच्या रस्त्यावरून दोन गट भिडले; जोरदार हाणामारी

Viral Video: 'देसी' आयडिया जिंदाबाद! सुरी मिळाली नाही म्हणून पठ्ठ्यानं कात्रीनं कापलं सफरचंद, व्हिडिओ पाहून म्हणाल 'व्वा!'

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

SCROLL FOR NEXT