Delhi Crime News
Delhi Crime NewsDainik Gomantak

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Delhi Crime News: राजधानी दिल्लीतील नबी करीम परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे.
Published on

राजधानी दिल्लीतील नबी करीम परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे. एका गर्भवती महिलेची तिच्या आधीच्या लिव्ह-इन पार्टनरने चाकूने वार करून हत्या केली, तर तिच्या पतीने संतापाच्या भरात हल्लेखोरालाच ठार केलं. पोलिसांनी रविवारी या घटनेची माहिती दिली आहे.

या घटनेत शालिनी (२२) आणि तिचा आधीचा लिव्ह-इन पार्टनर आशु उर्फ शैलेंद्र (३४) या दोघांचा मृत्यू झाला आहे. शालिनीचा पती आकाश (२३) गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आपल्या पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात जखमी झाला.

Delhi Crime News
Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

घटना कशी घडली?

डीसीपी (मध्य) निधीन वलसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे १०:१५ वाजता आकाश आणि शालिनी कुतुब रोडवर तिच्या आई शीलाला भेटण्यासाठी जात असताना ही घटना घडली. त्याच वेळी अचानक शालिनीचा आधीचा लिव्ह-इन पार्टनर आशु तिथे आला आणि आकाशवर चाकूने हल्ला केला.

पहिला वार आकाशने चुकवला, पण आशुने लगेच रिक्षात बसलेल्या शालिनीकडे वळून तिच्यावर चाकूने वार केले. आकाश तिला वाचवण्यासाठी धावला, पण त्यालाही गंभीर दुखापत झाली. तरीही त्याने हल्लेखोर आशुला रोखत त्याच्याकडचा चाकू हिसकावून घेत आशुवरच वार केला.

Delhi Crime News
Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

दोघांचाही जागीच मृत्यू

शालिनीचा भाऊ रोहित आणि स्थानिक नागरिकांनी तिघांनाही तत्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी शालिनी आणि आशु दोघांनाही मृत घोषित केले. आकाशला गंभीर जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं आहे. पोलिस तपासात समोर आलं की, शालिनी गर्भवती होती.

शालिनी आणि आकाश यांच्यात काही वर्षांपूर्वी वाद झाल्यानंतर ती काही काळ आशुसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. नंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने ती पुन्हा आकाशकडे परतली आणि आपल्या दोन मुलांसह नव्या आयुष्याची सुरुवात केली.

या गोष्टीमुळे आशु संतापला होता. त्याने शालिनीच्या गर्भातील बाळ आपलं असल्याचा दावा केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आशुचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड होता आणि तो नबी करीम पोलिस ठाण्यात नोंद असलेला गुन्हेगार होता. तसेच आकाशवरही तीन गुन्हेगारी गुन्ह्यांची नोंद आहे.

गुन्हा दाखल

शालिनीची आई शीलाने दिलेल्या तक्रारीवरून नबी करीम पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) आणि ३०७ (खूनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com