Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda News : दक्षिणेत पाद्री, मतांच्या ध्रुवीकरणामुळे पराभव : आमदार आमोणकर

Ponda News : प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याशी भाजप ठाम

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News :

फोंडा, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला अपयश मिळाले, तरी त्यांना ते पचवता आलेले नाही. त्यांना खासदारांची तीन अंकी संख्याही गाठता आली नाही. गोव्यातील निवडणुकीत भाजपची मते वाढली आहेत, तरी टीकास्त्र सुरू आहे.

दक्षिणेत गोव्यातील भाजपचा पराभव पाद्रींमुळे तसेच मतांच्या ध्रुवीकरणामुळे झाला. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप ठाम असल्याचा दावा आमदार संकल्प आमोणकर यांनी केला.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याविरुद्ध टीका करणारे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित पालेकर हे भाजपमध्ये फूट घालण्याचा प्रयत्न करतात. श्रीपाद नाईक जिंकून आल्यानंतर त्यांनी घुमजांव करत त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तम तसेच ते भ्रष्ट नाहीत, असेही ते म्हणतात.

तसेच मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष तसेच श्रीपाद नाईक यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये करून मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गोव्यातील लोकांचा नाईक यांच्यावर विश्‍वास असल्याने मागील निवडणुकीपेक्षा अधिक मते देऊन निवडून आणले आहे, असे आमोणकर म्हणाले.

देशातील काही राज्यांत ख्रिश्‍चन बांधवांनी मतदान केले, त्या काही मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. नेते गिरीराज पै वेर्णेकर यांनी मत व्यक्त केला.

...विषय संपला!

दक्षिणेत निवडणुकीवेळी धर्मगुरूंचा हस्तक्षेप झाला, या मताशी आजही मी ठाम आहे. निवडणुकीचा सर्वे केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून जे एकंदर दिसले, ते मांडले. आता हा विषय सध्या संपला आहे व त्यावर मला अधिक काही म्हणायचे नाही, असे मत प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT