Ponda Goa News: बकरी ईदच्या काळात उसगाव मांस मार्केट परिसरात जमावबंदी का लागू केलीय?

Section 144 around Goa Meat Complex at Usgao, Ponda: बकरी ईदच्या निमित्ताने 16 ते 19 जून या काळात उसगाव मांस मार्केट परिसरात जमावबंदी आदेश लागू असणार आहे.
Goa Meat Complex at Usgao, Ponda
Goa Meat Complex at Usgao, PondaDainik Gomantak

Section 144 around Goa Meat Complex at Usgao, Ponda

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी फोंड्यातील उसगाव मांस मार्केट परिसरात जमावबंदी लागू केली आहे. बकरी ईदच्या निमित्ताने हा आदेश लागू करण्यात आला असून, 16 ते 19 जून या कालावधीत चार व त्यापेक्षा अधिक लोकांना मार्केटच्या एक किलोमीटर परिसरात एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांनी याबाबद आदेश जारी केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, येत्या बकरी ईदच्या निमित्ताने तीन जून रोजी पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाच्या वतीने बैठक घेण्यात आली. फोंड्यातील उसगाव मार्केटमध्ये १७ आणि १८ जून रोजी दिल्या जाणाऱ्या कुर्बानीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

मुस्लिम जमात धारबांदोडा तालुक्यातील मोले आणि काणकोण तालुक्यातील पोळे तपासणी नाक्यावरुन उसगाव मार्केटमध्ये कुर्बानीसाठी जनावरांची वाहतूक करतील. येत्या १६ जून पासून सुरु होणारी वाहतूक १९ जूनपर्यंत सुरु राहणार आहे.

वाहतूक सुरळीत होण्यासाठी खात्याचे अधिकारी दोन्ही नाक्यावर हजर राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

Goa Meat Complex at Usgao, Ponda
Goa Video: 'सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही', तुरुंगात टाकल्याबद्दल श्रेया मुख्यमंत्र्यांना म्हणाली I Love You

भूतपूर्व काळात उसगाव मांस मार्केट परिसरात कत्तलविरोधात बॅनरबाजी झालीय. अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्यासह, समाजातील शांतता भंग होऊ शकते. तसेच, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे आदेशात म्हटले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी उसगाव मांस मार्केट परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार, मार्केट परिसरात चार व चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मार्केटच्या सुरक्षा भिंतीपासून एक किलोमीटर परिसरात हा बंदी आदेश लागू असेल. 16 ते 19 जून या काळात हा आदेश लागू असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com