Ponda By Election Dainik Gomantak
गोवा

Ponda By Election: उमेदवारी कुणाला? फोंडा पोटनिवडणूकीचे बिगुल; भाजपकडून रितेश - विश्‍‍वनाथ, काँग्रेसचे भाटीकर- वेरेकर स्‍पर्धेत

Ponda By Election Dates: माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांचे १५ ऑक्‍टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्‍यामुळे फोंड्याची ही जागा रिक्त झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : फोंडा विधानसभा मतदारसंघासाठी येत्‍या ९ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार असून, या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार असल्‍याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली.

फोंडा मतदारसंघ स्‍वत:च्‍याच हाती ठेवण्‍यासाठी भाजपने, तर २०२७ मध्‍ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी फोंडा पोटनिवडणुकीच्‍या माध्‍यमातून भाजपला झटका देण्‍याचे प्रयत्‍न विरोधी काँग्रेसने सुरू केले असून, जिंकू शकणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी देण्‍यासंदर्भात त्‍यांच्‍याकडून हालचाली सुरू झाल्‍या आहेत.

माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांचे १५ ऑक्‍टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्‍यामुळे फोंड्याची ही जागा रिक्त झाली आहे.

या जागेसाठी येत्‍या ९ एप्रिल रोजी निवडणूक घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने निश्‍चित केले आहे. या पोटनिवडणुकीसाठी २३ मार्चपर्यंत अर्ज सादर करता येतील. २४ मार्च रोजी अर्जांची छाननी होईल, तर २६ मार्च रोजी अर्ज मागे घेण्‍याचा दिवस असल्‍याचे आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे.

रवी नाईक यांच्‍या निधनानंतर भाजपसोबत सत्तेत असलेल्‍या मगोपने ‘फोंड्यातील पोटनिवडणुकीत भाजपने रवी नाईक यांचे ज्‍येष्‍ठ सुपुत्र रितेश यांना उमेदवारी देऊन त्‍यांना निवडून आणावे’, अशी भूमिका मांडली होती. तर, ‘रितेश यांना तत्‍काळ मंत्रिमंडळात घेऊन पोटनिवडणुकीची उमेदवारी द्यावी’, अशी मागणी अखिल गोमंतक भंडारी समाजाने केली होती.

परंतु, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी याबाबत पूर्णत: मौन बाळगले होते. अखेर दोन दिवसांपूर्वी झालेल्‍या बैठकीनंतर भाजपने रितेश नाईक आणि फोंड्याचे माजी नगराध्‍यक्ष विश्‍‍वनाथ दळवी या दोघांची नावे भाजपच्‍या केंद्रीय समितीकडे सादर केली आहेत.

काँग्रेसने सुरुवातीला फोंडा पोटनिवडणुकीची उमेदवारी पुन्‍हा एकदा राजेश वेरेकर यांना देण्‍याचे जवळपास निश्‍चित केले होते.

परंतु, मगोपला सोडचिठ्ठी देऊन काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्‍ये प्रवेश केलेल्‍या डॉ. केतन भाटीकर यांच्‍यामुळे काँग्रेस उमेदवारीचा गुंता वाढला आहे. याबाबत सोमवारी प्रदेश काँग्रेस समितीची बैठक घेणार असल्‍याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी रविवारी ‘गोमन्‍तक’ला दिली.

सरदेसाईंशी करणार चर्चा :

काँग्रेससोबत युतीत असलेले गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्‍याशी फोंडा पोटनिवडणुकीबाबत सोमवारी चर्चा करणार आहे. त्‍यांना विश्‍‍वासात घेऊनच उमेदवाराची निवड केली जाईल. आम आदमी पक्ष (आप) किंवा रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स (आरजीपी) या पक्षांनी अद्याप यासंदर्भात माझ्याशी चर्चा केलेली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT