Ponda By Election Dainik Gomantak
गोवा

Ponda By Election: फोंड्यात भाजपला 'गटबाजी'ची भीती! उमेदवारीचा पेच सुटेना; युती असूनही मगोचे काही कार्यकर्ते काँग्रेससोबत

Ponda Politics: काँग्रेसने नुकतेच पक्षात प्रवेश केलेले डॉ. केतन भाटीकर यांना उमेदवारी जाहीर करत आघाडी घेतली आहे, तर भाजपने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: ९ एप्रिल रोजी होणाऱ्या फोंडा पोटनिवडणुकीची घोषणा होताच तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने नुकतेच पक्षात प्रवेश केलेले डॉ. केतन भाटीकर यांना उमेदवारी जाहीर करत आघाडी घेतली आहे, तर भाजपने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही.

काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांनी भाटीकरांना पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसची बाजू अधिक बळकट झाली आहे. दोघांनाही मागील निवडणुकीचा अनुभव असल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र या पाठिंब्यामागे अंतर्गत राजकारण दडलेले तर नाही ना, अशी शंका काही विश्‍‍लेषक व्यक्त करत आहेत. याची जाणीव ठेवून भाटीकर यांनी आपली स्वतंत्र कार्यकर्त्यांची फळीही सक्रिय ठेवली आहे.

दुसरीकडे, भाजपसमोर सर्वांत मोठे आव्हान म्हणजे उमेदवारीचा पेच. फोंडा भाजपमध्ये दोन गट स्पष्टपणे सक्रिय असून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्री तथा आमदार स्‍व. रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक आणि भाजप दक्षिण गोवा सचिव विश्‍‍वनाथ दळवी यांची नावे हायकमांडकडे पाठवण्यात आली असली तरी अंतिम निर्णय झालेला नाही. आतल्या गोटातील माहितीनुसार रितेश नाईक यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले आहे; मात्र संभाव्य बंडाळीच्या भीतीमुळे घोषणा लांबवली जात असल्याचे सांगितले जातेय.

विश्‍‍वनाथ दळवी समर्थकांचा दबाव आणि बंडाचे संकेत लक्षात घेता भाजप सावध पावले टाकत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत केवळ ७७ मतांच्या फरकाने विजय मिळाल्याची जाणीव असल्याने पक्ष कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. गटबाजी नियंत्रणात आणण्यासाठीही भाजपमध्ये चर्चासत्रे सुरू असल्याची माहिती मिळते.

राज्‍यात मगो-भाजप युती असली तरी फोंड्यातील काही मगोचे कार्यकर्ते भाटीकरांसोबत फिरताना दिसत आहेत. झेडपी निवडणुकीतही असेच चित्र दिसले होते, ज्याचा फायदा भाटीकर यांनी समर्थन दिलेल्‍या अपक्ष उमेदवाराला झाला होता. त्यामुळे यंदाही मगोची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सध्याच्या घडीला काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत होण्याचे संकेत मिळत असून, फोंड्यात ‘कोण ठरणार सिकंदर’ याची चर्चा रंगू लागली आहे.

मगोची भूमिका ठरणार निर्णायक

भाजपसोबत युती असूनही फोंड्यातील काही मगो कार्यकर्ते काँग्रेस उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्‍यासोबत सक्रिय दिसत आहेत. जिल्‍हा पंचायत निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता मगोची भूमिका या निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरू शकते.आहे हे दिसून येते.

भाजपमध्ये उमेदवारीवरून तणाव; सावध पवित्रा

फोंडा भाजपमध्ये दोन गटांमध्ये संघर्ष वाढला आहे. त्‍यामुळे उमेदवारीवरून तणाव निर्माण झाला आहे. रितेश नाईक व विश्‍‍वनाथ दळवी यांच्या समर्थकांमध्ये चुरस असून बंडाळीची शक्यता लक्षात घेऊन पक्ष नेतृत्व सावध पवित्रा घेत आहे.

आम आदमी पक्षाकडून चाचपणी सुरू

आम आदमी पक्षही या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाला फोंड्यात अवघी ६२० मते मिळाली होती. यंदा कितपत प्रभाव पाडता येईल, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, ‘आरजी’ची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही.

भाजपचे ‘चलो फोंडा’ अभियान

विधानसभा अधिवेशन संपताच सरकारमधील मंत्र्यांना फोंडा मतदारसंघातील विविध भागांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपकडून ‘चलो फोंडा’ मोहीम सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावरून ही निवडणूक पक्षासाठी किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT