Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Ponda: 'फोंडा अध्यात्मिक शहर बनवणार'! प्रचारसभेत केजरीवालांची घोषणा; पारदर्शक प्रशासन देण्याचा वायदा

Arvind Kejriwal: फोंड्याला अध्यात्मिक शहराचा दर्जा मिळवून देऊ, अशी ग्वाही आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : फोंड्यातून आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांना निवडून दिल्यास कचराकुंडी बनण्याच्या मार्गावर असलेल्या फोंड्याला अध्यात्मिक शहराचा दर्जा मिळवून देऊ, अशी ग्वाही आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. तसेच, येत्या सहा महिन्यांत फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ सुसज्ज करू, असेही त्यांनी सांगितले. फोंड्यात बसस्थानकावर आयोजित जाहीर प्रचार सभेत केजरीवाल बोलत होते.

या सभेला ‘आप’चे उमेदवार गीतेश नाईक, आमदार क्रूझ सिल्वा, आमदार व्हेंझी व्हिएगस, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, प्रशांत नाईक, ममता माबेन तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन संदेश तेळेकर-देसाई यांनी केले.

केजरीवाल म्हणाले की, भाजप आणि काँग्रेस यांनी आतापर्यंत लोकांची फसवणूक केली आहे. फसवी आश्वासने देत जनतेला झुलवत ठेवणाऱ्या या दोन्ही पक्षांवर विश्वास ठेवू नये.

फोंड्यात अनेक मंदिरे असली, तरी परिसरात कचरा साचलेला दिसतो. त्यामुळे फोंडा जिंकून दिल्यास त्याचा कायापालट करू. पारदर्शक प्रशासन देण्याबरोबरच वीज, पाणी आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा सुधारू, असे त्यांनी नमूद केले. तसेच, दिल्ली व पंजाबच्या धर्तीवर ‘मोहल्ला क्लिनिक’ सुरू करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

आमदार क्रूझ सिल्वा म्हणाले की, विरोधात असतानाही आम्ही अनेक विकासकामे केली आहेत. विशेषतः आरोग्य सेवा मतदारसंघात विविध ठिकाणी सुरू केल्या असून त्याच धर्तीवर फोंड्याचाही विकास होईल.

यावेळी वाल्मिकी नाईक, प्रशांत नाईक आणि ममता माबेन यांनी ‘आप’ला एक संधी देण्याचे आवाहन करत सत्तेत आल्यास गोव्याचा कायापालट करू, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…तर राजकारणातून संन्यास घेऊ!

आमदार व्हेंझी व्हिएगस म्हणाले की, गीतेश नाईक निवडून आल्यावर सहा महिन्यांत फोंड्यात ‘मोहल्ला क्लिनिक’ सुरू झाले नाही, तर मी राजकारणातून संन्यास घेईन आणि २०२७ ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी ‘आप’ कार्यरत असून दिल्ली व पंजाबमध्ये त्याचा प्रत्यय आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT