

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत मागील लढतीत गुवाहाटी येथे नॉर्थईस्ट युनायटेडला नमविल्यानंतर आंजेल बियादेरो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघ दक्षिणतेली आव्हानासाठी सज्ज झाला आहे. केरळा ब्लास्टर्सविरुद्धचा सामना रविवारी (ता. २९) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.
‘‘ताकदवान प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि आमच्या खेळात सुधारणा करण्यासाठी आम्हाला आठवभराचा कालावधी मिळाला असून आम्ही रविवारच्या लढतीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे,’’ असे बियादेरो यांनी शनिवारी सांगितले. मागील लढतीत होर्गे ओर्तिझ व उदांता सिंग जायबंदी झाले होते. ते अनुपलब्ध असून त्यांची जागा घेणारे गुणवान उदयोन्मुख खेळाडू संघात असल्याचा विश्वास स्पॅनिश मार्गदर्शकाने व्यक्त केला. महंमद नेमिल याने ३४व्या सेकंदास वेगवान गोल नोंदविल्यानंतर नॉर्थईस्टविरुद्ध एफसी गोवाला बाकी कालावधीत बचावावर जास्त भर द्यावा लागला होता. ॲश्ली वेस्टवूड यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सने अनुक्रमे मुंबई सिटी व चेन्नईयीनविरुद्ध गोलशून्य बरोबरी नोंदविली होती.
मैदानात उतरण्यापूर्वी...
एफसी गोवा : ५ सामने, २ विजय, २ बरोबरी, १ पराभव, ८ गुण
केरळा ब्लास्टर्स : ४ सामने, १ विजय, २ बरोबरी, १ पराभव, ५ गुण
मागील लढतीत : १८ मे २०२६ रोजी कोची येथे केरळा ब्लास्टर्सचा २-१ असा विजय
आमने-सामने : २३ सामने, एफसी गोवाचे १३ विजय, केरळा ब्लास्टर्सचे ६ विजय, ४ बरोबरी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.