Ponda BJP by election Dainik Gomanatak
गोवा

Ponda By Election: 'फोंड्यात कमळ फुलवणे हीच रवींना श्रद्धांजली'! दामू नाईकांचे प्रतिपादन; उमेदवार कोण? प्रश्नाला दिली बगल

Ravi Naik: पुन्हा एकदा पोटनिवडणुकीत भाजपचे कमळ फुलवणे हीच खरी रवी नाईक यांना श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काढले.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: ज्या फोंड्यात रवी नाईक यांनी भाजपचा आमदार म्हणून विजय प्राप्त केला, त्याच फोंड्यात त्यांच्यानंतर आता पुन्हा एकदा पोटनिवडणुकीत भाजपचे कमळ फुलवणे हीच खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काढले.

फोंड्यात मंगळवारी सनईनमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष ॲड. मनोहर आडपईकर, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, नगरसेवक तथा राजीव गांधी कलामंदिरचे अध्यक्ष रितेश नाईक, विश्‍वनाथ दळवी, रॉय नाईक, आनंद नाईक, भाजप मंडळ अध्यक्ष हरेश नाईक तसेच उदय डांगी आदी उपस्थित होते.

दामू नाईक म्हणाले की, फोंड्याचा आणि पर्यायाने गोव्याचा विकास हा रवी नाईक यांनी केला. आपल्या मुख्यमंत्रीपद तसेच उपमुख्यमंत्री, खासदार व इतर पदांच्या जबाबदारीतून त्यांनी फोंड्याला काहीच कमी पडू दिले नाही. फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिर, सहकार भवन, क्रीडा संकूल व इतर अनेक विकासकामे त्यांनी केली.

फोंडा उमेदवाराच्या नावाला बगल!

फोंडा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असे विचारले असता नावाला बगल देत तो निर्णय भाजप बैठकीत घेण्यात येणार असून सर्वसंमतीनेच नाव जाहीर केले जाईल, असे दामू नाईक म्हणाले. पोटनिवडणुकीत फोंड्यातील अनेकांची नावे समोर आली आहेत, मात्र सारासार विचार करूनच नाव जाहीर करण्यात येईल, असे दामू नाईक म्हणाले.

बैठकीत झाली चर्चा...!

पत्रकार परिषदेनंतर दामू नाईक यांनी सर्व उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत फोंड्यातील स्थितीबाबत औपचारिक चर्चा केली. पोटनिवडणूक जवळ ठेपली असली तरी सत्ताधारी भाजपने अजून नाव जाहीर केलेले नाही, असे विचारल्यावर लवकरच जाहीर करू, असे दामू नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

SCROLL FOR NEXT