Ponda by Election: फोंडा पोटनिवडणूक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात? भाजप- काँग्रेसच्या उमेदवारीबाबत अजूनही गोपनीयता

Ponda by Election Date : माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनाला १४ फेब्रुवारी रोजी चार महिने पूर्ण झाले असले तरी अजूनही फोंडा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही.
Ponda by election
Ponda by electionDainik Gomatnak
Published on
Updated on

फोंडा: माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनाला १४ फेब्रुवारी रोजी चार महिने पूर्ण झाले असले तरी अजूनही फोंडा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही. १४ एप्रिलला रवींच्या निधनाला सहा महिने पूर्ण होणार असल्यामुळे तत्पूर्वी फोंड्याला नवा आमदार मिळणे आवश्यक आहे. आता ही पोटनिवडणूक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते, असेही संकेत मिळत आहे. असे असले तरी उमेदवारीबाबत भाजप व काँग्रेसने पत्ते उघडलेले दिसत नाहीत. फोंडा भाजपमध्ये सध्या दोन गट झाल्याचे दिसते. शहरात सुरू असलेली भाजपची दोन कार्यालये हे याचे जीवंत उदाहरण आहे. खडपाबांध येथील रवी नाईक यांचे कार्यालय सध्या त्यांचे पुत्र रितेश आणि रॉय चालवितात.

दुसऱ्या बाजूला भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे दक्षिण गोवा सचिव विश्वनाथ दळवी यांनी नवे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात उघडले आहे. भाजपची ही दोन कार्यालये लोकांच्या चर्चेचा विषय ठरली असून भाजपश्रेष्ठींकरता मात्र ती डोकेदुखी ठरत आहेत. दळवींनी नवे कार्यालय सुरू करून रवी नाईकांच्या कार्यालयासमोर आव्हान उभे केल्याचे बोलले जात आहे.

फोंड्यातील भाजपचे जुने कार्यकर्ते दळवींच्या बाजूने असून रवींसोबत काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते रितेशसोबत दिसत आहेत. या पोटनिवडणुकीवेळी बंडाळी माजू शकते की काय, याचा आढावा भाजपचे स्थानिक नेते सध्या घेत आहेत. याच गदारोळात भाजपची उमेदवारी लटकली आहे. काँग्रेसही उमेदवारी जाहीर करण्यास चालढकल करत आहे. गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी फोंड्याच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती.

पण तेव्हाही त्यांनी उमेदवारी जाहीर करण्याचे टाळले. यावर श्रेष्ठी निर्णय घेतील, असे सांगून त्यांनी चेंडू हायकमांडच्या रिंगणात टोलवला. गेल्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार राजेश वेरेकर हेच फोंडा काँग्रेसची सूत्रे सांभाळत असल्यामुळे त्यांना यावेळी उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती;

पण मगोपचा राजीनामा देऊन कुर्टी जि.पं. निवडणुकीत अपक्ष उमेदवार रिंगणात उतरविलेले डॉ. केतन भाटीकर यांचे नाव काँग्रेस उमेदवार म्हणून ऐकू येऊ लागले आहे. येत्या आठवड्यात भाटीकर काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशीही वदंता आहे. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसची उमेदवारीही अद्याप निश्चित होऊ शकलेली नाही.

अशोक नाईक यांची उमेदवारीसाठी दावेदारी

१९८० सालापासून म्हणजेच रवी नाईक यांच्या पहिल्या निवडणुकीपासून ते २०२२ सालच्या निवडणुकीपर्यंत त्यांच्यासोबत कार्यरत असल्यामुळे मी फोंडा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारीचा प्रमुख दावेदार ठरू शकतो, असा दावा भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष अशोक नाईक यांनी केला आहे.

Ponda by election
Ponda Theft: फोंड्यात चोरट्यांचा हैदोस! एकाच रात्रीत दोन मंदिरे आणि बंगल्यावर डल्ला

‘आरजी’ची भूमिका अस्पष्ट

युतीबाबत काँग्रेसने आपल्याला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, या आरजीप्रमुख मनोज परब यांच्या वक्तव्यामुळे ‘आरजी’ची याबाबतची भूमिका अस्पष्ट आहे. गेल्या निवडणुकीत फोंड्यात १७४० मते प्राप्त झाली होती.

Ponda by election
Ponda: अग्निशमन दलाच्या आवारात पेट्रोलपंप! फोंडावासीयांचा विरोध; जिल्हाधिकारी कार्यालयात हरकत दाखल

‘आप’ची झेप कुठपर्यंत?

‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केल्याप्रमाणे ‘आप’ही रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागला असून काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या मनस्थितीत ते सध्या तरी हा पक्ष दिसत नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला फोंड्यात फक्त ६४० मते प्राप्त झाली होती. त्यामुळे आता ते या पोटनिवडणुकीत किती झेप घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com