Ponda political Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात समीकरण बदलाचे संकेत, इच्छुक लागले तयारीला; काँग्रेस, भाजपच्या उमेदवारीवर लक्ष

Ponda political equation change: पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर आता फोंड्यात सगळ्यांचे लक्ष २०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीवर लागले असून ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळायला लागले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा : पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर आता फोंड्यात सगळ्यांचे लक्ष २०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीवर लागले असून ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळायला लागले आहेत.

पोटनिवडणूक रद्द होते न होते तोच गेल्या विधानसभेतील फोंड्याचे काँग्रेस उमेदवार तसेच गोवा काँग्रेसचे सरचिटणीस राजेश वेरेकर यांनी फोंड्याच्या काँग्रेस उमेदवारीवर दावा ठोकला असून रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आगामी निवडणुकीची काँग्रेसची उमेदवारी पोटनिवडणुकीचे उमेदवार असलेले डॉ. केतन भाटीकर यांनाच मिळणार असल्याचे जाहीर केल्यामुळे काय खरे आणि काय खोटे, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. राजेश हे गेली पाच-सहा वर्षे काँग्रेसमध्ये आहेत. त्यांना विधानसभेबरोबर लोकसभेच्या निवडणुकीच्या कार्याचाही अनुभव आहे.

याउलट, भाटीकरांची भिस्त होती ती त्यांच्या जुन्या साथीदारांवर. मागच्या वेळी याच त्यांच्या साथीदारांनी त्यांना विजयाच्या समीप आणून ठेवले होते. मात्र, मागच्या वेळी ‘मगो’त असलेले भाटीकर यावेळी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वृत्तीमध्ये काहीही फरक दिसून आला नव्हता. अर्थात या पोटनिवडणुकीत फोंड्यात असलेली काँग्रेसची काही पारंपरिक मते भाटीकरांच्या पारड्यात पडू शकली असती, हेही तेवढेच खरे आहे; पण आता राजेश वेरेकर हे रिंगणात उतरणार असल्यामुळे समीकरणे बदलू शकतात, असे दिसते आहे.

दुसऱ्या बाजूला भाजपचीही तशीच स्थिती आहे. रद्द झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले नगरसेवक विश्वनाथ दळवी यावेळी रिंगणात उतरणार हे जवळजवळ निश्चित आहे. आता त्यांना भाजपची उमेदवारी मिळते का परत एकदा तिथे रितेश नाईकांची वर्णी लागते, हे बघावे लागेल.

पण कोणत्याही परिस्थितीत भाजपमधला संघर्ष अटळ असल्याचे सध्या तरी दिसते आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर करताना काँग्रेसला तसेच भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार, अशी शक्यता सध्या व्यक्त होत आहे. उमेदवारी न मिळालेला अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यास चौरंगी लढत होऊ शकते, यात शंकाच नाही. आणि असे झाले तर ती ‘कांटे की टक्कर’ होऊ शकते, असा होराही व्यक्त केला जात आहे.

एकंदरीत सध्याचे चित्र पाहता आगामी निवडणुकीत फोंड्यात दिवंगत रवी नाईकांचा राजकीय उत्तराधिकारी कोण? याचे उत्तर मिळणे अधिकच गुंतागुंतीचे होणार, हे निश्चित.

रितेशना मंत्रिपद मिळणार?

पोटनिवडणूक रद्द झाल्यामुळे आमदारकीची संधी हुकलेले दिवंगत रवी नाईक यांचे पुत्र रितेश यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सध्या फोंड्यात सुरू आहे. मंत्रिपद दिल्यास त्यांना सहा महिन्यांत निवडून यावे लागणार आहे. पण आगामी निवडणुकीला कमीत-कमी आठ महिने असल्यामुळे त्यांना कसे ‘ॲडजस्ट’ केले जाते यावर लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाटीकरांचेही उपक्रम सुरू

पोटनिवडणूक रद्द झाली म्हणून आलेली मरगळ झटकून काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर परत आपल्या कार्याला लागल्याचे दिसत आहे. कुर्टी-खांडेपार येथे त्यांनी सामाजिक उपक्रम सुरू केल्याचे बघायला मिळाले.

वेरेकरांच्या गाठीभेटी सुरू

काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राजेश वेरेकर यांनी लोकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरवात केली असून आपण आतापर्यंत काय सामाजिक कार्य केले हे ते लोकांना विशद करताना दिसत आहेत.

दळवींची उपक्रमांना परत चालना

पोटनिवडणुकीमुळे बंद असलेले नगरसेवक विश्वनाथ दळवी यांचे सामाजिक उपक्रम परत सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसांत ते अनेक वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RFDL Final 2026: एफसी गोवा संघ अंतिम फेरीत दाखल, विजेतेपदासाठी बंगळूर एफसीविरुद्ध लढत

IPL 2026 Points Table: लखनौ 'फ्लॉप', आरसीबी 'टॉप'! गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कब्जा; टॉप-5 मध्ये मोठी उलथापालथ

Canacona: काणकोण राष्ट्रीय महामार्गावर वाढताहेत अपघात, चढ-उतारांमुळे वाहनांवरील नियंत्रण सुटत असल्याचा वाहनचालकांचा दावा

US Iran War: इराणला उद्ध्वस्त करण्याची ट्रम्प यांची 'ब्लूप्रिंट' तयार! तेहरानसमोर ठेवल्या 10 जाचक अटी; म्हणाले, 'ही फायनल ऑफर'

Sal river pollution: खारेबांध येथे नाल्याच्या मुखावरच झोपडपट्टी, साळ नदीत थेट मलमूत्र विसर्ग; अधिकाऱ्यांच्या पाहणीत धक्कादायक बाब उघड

SCROLL FOR NEXT