Viral Video: 'आणखी खा चविष्ट समोसे, चिखल अन् पायाचा मळ एकत्र...', प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा व्हिडिओ व्हायरल; IRCTC नं घेतली दखल

IRCTC Action On Unhygienic Railway Food: सोशल मीडियावर रोज अनेक मजेशीर आणि अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण काही वेळा असे व्हिडिओ समोर येतात, जे पाहून आपण थक्क होतो.
Train Samosa Vendor Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Train Samosa Vendor Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक मजेशीर आणि अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण काही वेळा असे व्हिडिओ समोर येतात, जे पाहून आपण थक्क होतो. विशेषतः आपण जे पदार्थ आवडीने खातो, ते किती घाणेरड्या पद्धतीने ठेवले जातात, हे दाखवणारे व्हिडिओ मनामध्ये भीती निर्माण करतात. सध्या असाच एक रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एका ट्रेनच्या डब्यात समोसे विकणारा एक विक्रेता जमिनीवर बसलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी समोशांनी भरलेला एक मोठा ट्रे ठेवलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ट्रेमध्ये प्रवाशांना विकण्यासाठी समोसे ठेवले आहेत, त्याच ट्रेच्या एका बाजूला या विक्रेत्याने आपला पाय ठेवला आहे. आजूबाजूची कोणतीही पर्वा न करता, समोशाच्या ट्रेवर पाय ठेवून तो आरामात मोबाईलवर कोणाशी तरी बोलण्यात मग्न आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या ट्रेनमधील आहे आणि कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकारामुळे रेल्वेमधील अन्नपदार्थांच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Train Samosa Vendor Viral Video
Viral Post: "पेड लीव्ह आमचा हक्क, उपकार नाही!" कॉर्पोरेट कंपन्यांच्या 'टॉक्सिक' कल्चरवर भडकली तरुणी Watch Video

हा व्हिडिओ 'एक्स' वर @Mrs_Tyagiji नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला. हा व्हिडिओ शेअर करताना युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आणखी खा चविष्ट समोसे; चिखल आणि पायाचा मळ, सगळं एकत्र!' हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटीझन्सनी यावर तीव्र संताप व्यक्त केला.

Train Samosa Vendor Viral Video
Viral Video: थोडंही संतुलन बिघडलं तर खेळ खल्लास! मृत्यूला मुठीत घेऊन काकाची लखनौच्या रस्त्यावर खतरनाक स्टंटबाजी; भन्नाट स्वॅग व्हायरल

या घटनेची गंभीर दखल घेत भारतीय रेल्वेच्या 'आयआरसीटीसी' ने तात्काळ पावले उचलली. या बेजबाबदार विक्रेत्यावर कडक कारवाई करण्यासाठी IRCTC ने या पोस्टवर कमेंट केली. त्यांनी लिहिले की, 'महोदया, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कृपया संबंधित ट्रेन नंबर, घटनेची तारीख आणि तुमचा मोबाईल नंबर आमच्यासोबत शेअर करा.' रेल्वेच्या या तत्परतेनंतर आता दोषी विक्रेत्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com