Ponda And Sanquelim Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Ponda-Sanquelim Muncipality Election 2023: साखळी नराध्यक्षपद महिलांसाठी राखीव; दोन्ही नगरपालिकांसाठी 188 उमेदवारी अर्ज

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda-Sanquelim Muncipal Council Election 2023: राज्यात फोंडा आणि साखळी नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दोन्ही नगरपालिकेसाठी आज (मंगळावारी) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता.

दरम्यान, दोन्ही नगरपालिकांसाठी एकूण 118 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 61 अर्ज फोंडा पालिकेसाठी तर, साखळीसाठी 57 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

साखळी नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी फोंडा पालिकेमध्ये 16 तर साखळी पालिकेमध्ये 26 अर्ज दाखल झाले. त्यामुळे फोंडा पालिकेच्या 15 प्रभागांसाठी एकूण 61 अर्ज तर, साखळी नगरपालिकेच्या 12 प्रभागांसाठी 57 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, गुरूवारी (दि.20) अर्ज माघारी घेण्याचा दिवस असेल. अर्ज संख्या पाहता दोन्हीही पालिकांमध्ये काँग्रेस आणि भाजप समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरले आहेत. फोंड्यात मगोच्या समर्थकांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, साखळी पालिकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर राजकारणातील धुरंधर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषिमंत्री रवी नाईक यांनी फोंडा पालिका आपल्याकडेच ठेवण्यासाठी विविध क्लृप्त्या आखलेल्‍या दिसत आहेत.

फोंडा पालिकेत नाईक कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. आता नव्याने रवी नाईक यांचे दोन्हीही पुत्र रॉय आणि रितेश रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या साथीला विश्वनाथ दळवी आणि इतर भाजप पुरस्कृत नगरसेवक आहेत.

मंत्री नाईक यांचे दोन्ही पुत्र रिंगणात उतरल्याने भाजप मधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT