Municipality Election Dainik Gomantak
गोवा

Goa Municipality Elections 2023: गोव्यात नगरपालिका निवडणुकीची धामधूम! पालिकांसाठी भाजप आक्रमक, मात्र विरोधकांमध्ये सामसूम

दैनिक गोमन्तक

Goa Municipality Elections 2023: राज्यात फोंडा आणि साखळी नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या, मंगळवार हा शेवटचा दिवस आहे.

या निवडणुका राजकीय चिन्हांवर, पक्षीय पातळीवर होत नसल्या तरी दोन्हीही पालिकांमध्‍ये आपलेच समर्थक निवडून येतील, यासाठी भाजपने रणनीती आखत विरोधकांना थोपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे विरोधकांमध्ये या निवडणुकांबाबत कोणीही गंभीर दिसत नाही.

साखळी पालिकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर राजकारणातील धुरंधर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषिमंत्री रवी नाईक यांनी फोंडा पालिका आपल्याकडेच ठेवण्यासाठी विविध क्लृप्त्या आखलेल्‍या दिसत आहेत.

फोंडा पालिकेत नाईक कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. आता नव्याने रवी नाईक यांचे दोन्हीही पुत्र रॉय आणि रितेश रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या साथीला विश्वनाथ दळवी आणि इतर भाजप पुरस्कृत नगरसेवक आहेत.

त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापासून आपल्या प्रचारात आघाडी घेतलेली दिसत आहे; तर दुसरीकडे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार अद्यापही आक्रमक दिसत नाहीत.

या निवडणुकीत मगोप महत्त्वाची भूमिका बजावेल, असे वाटत असताना त्यांनीही आपला हात आखडता घेतला आहे. मगोपने समर्थकांना व्यक्तिगत पातळीवर निवडणूक लढा, असा सल्ला दिला आहे.

अशातच केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा भाजप समर्थकांच्या पथ्यावर पडेल, असा कयास आहे.

घराणेशाहीची चर्चा

फोंडा पालिका निवडणूक यंदा मोठी रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश आणि रॉय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज सोमवारी ३२ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याने एकूण संख्या ४१ इतकी झाली आहे.

मंत्री नाईक यांचे दोन्ही पुत्र रिंगणात उतरल्याने भाजपमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

दोन्ही पालिकांमध्ये भाजप समर्थक मोठ्या प्रमाणात निवडून येतील आणि या दोन्हीही पालिका भाजपच्या ताब्यात येतील, यात शंका नाही. सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून गुरुवारी २० एप्रिल रोजी आमच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करू.

- सदानंद शेट तानावडे,

प्रदेशाध्यक्ष, भाजप.

काँग्रेसने यापूर्वीच दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्षीय पातळीवर या निवडणुका होत नसल्याने पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले जातील. आम्ही ही निवडणूक सहजपणे घेतलेली नाही, सर्व ताकदीनिशी ती लढविली जाईल.

- अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

राजेश सावळ यांची माघार

साखळी : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विर्डी गावातील दोन्ही प्रभाग हे महिला आणि महिला ओबीसी आरक्षित झाल्याने त्या प्रभागांमधून आपणास रिंगणात उतरण्यास वाव राहिला नाही.

त्यामुळे यावेळी आपण पालिकेच्या निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी सोमवारी केली. पॅनलच्या इतर उमेदवारांना निवडून आणण्याचे आपले ध्येय आहे, असे ते म्हणाले.

काही जागांसाठी शोध सुरू : फोंडा, साखळी पालिकेसाठी सोमवारी सातव्या दिवशी ५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात फोंड्यासाठी ३६ तर साखळीसाठी २३ उमेदवारी अर्जाचा समावेश आहे.

दोन्ही पालिकेसाठी अर्जसंख्या ७६ झाली आहे. या अर्जांत व्यक्तिगत, पक्षांच्या समर्थक पॅनलच्या उमेदवारांचा समावेश आहे. काही जागांवर पक्षांकडून समर्थक उमेदवारांचा शोध सुरूच आहे. उद्या, १८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT