Pollution Control Board Dainik Gomantak
गोवा

Goa Pollution Control Board: गोवा 'अंबे मेटालिक' प्रकल्पाला आता होंडावासीयांचाही जोरदार विरोध

Goa Pollution: अंबे मेटालिक प्रकल्पाला परवानगी दिल्यास शेती, नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण, जैवविविधता धोक्यात येईल.

दैनिक गोमन्तक

Goa Pollution: पिसुर्ले औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या अंबे मेटालिक कंपनीच्या विस्ताराला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये. या प्रकल्पाच्या विस्ताराला परवानगी दिल्यास शेती-बागायती, नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण, जैवविविधता धोक्यात येणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या विस्ताराला काल होंडा पंचायतीतर्फे खास आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत नागरिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला.

गेल्या रविवारी पिसुर्ले-सत्तरी येथील पंचायत सभागृहात जाहीर सुनावणी झाली होती. त्यावेळी या विस्ताराला विरोध केला होता. त्यानंतर आज होंडा येथे खास ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रकल्पाला पर्यावरण दाखला देण्यासाठी या कंपनीने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आपला प्रस्ताव सादर केलेला आहे. या संदर्भाची जनहित सुनावणी नुकतीच पार पडली.

रासायनिक झोन रद्द करावा

पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बी‌.डी. मोटे यांनी यावेळी हा प्रकल्प नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात हानिकारक आहे. त्याचबरोबर पिसुर्ले औद्योगिक वसाहत रासायनिक झोन म्हणून जाहीर केलेला आहे. हा झोन त्वरित रद्द करावा व या प्रकल्पाच्या विस्ताराला मान्यता देण्यात येऊ नये, अशा प्रकारची मागणी केली.

शिवदास माडकर, होंडा पंचायतीचे सरपंच-

कंपनीने खोटे अहवाल सादर करून त्यात प्रस्तावित अहवालामध्ये सभोवताली भागामध्ये कोणत्याही प्रकारची वारसास्थळे नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नसल्याची खोटी माहिती नमूद केलेली आहे. हा अहवाल पूर्णपणे चुकीचा असून प्रत्यक्षपणे या संदर्भात पाहणी करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT