Goa Lokotsav 2022: लोकोत्सव ही केवळ युवा शक्तीचीच किमया- रमेश तवडकर

Goa Lokotsav 2022: काणकोणात अन्न, कृषी उत्पादनावर आधारित उद्योगांना भरपूर वाव आहे.
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarDainik Gomantak

Goa Lokotsav 2022: लोकोत्सव हे युवकांनी तयार केलेले व्यासपीठ आहे. मी या सर्व प्रक्रियेत नाममात्र आहे, ही युवा शक्तीची किमया आहे. युवकांच्या सशक्तीकरणाद्वारे विकासाचे ध्येय साध्य करणार, असे मत लोकोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित युवा सशक्तीकरण कार्यक्रमाच्या उद्‌घाटन सोहळ्यावेळी सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

उद्‌घाटन सोहळ्याला लोलयेच्या सरपंच प्रतिजा बांदेकर, उपसरपंच चंद्रकांत सुदीर, श्रीस्थळच्या सरपंच सेजल गावकर, अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे कमिशनर दीपक करमरकर, नगरसेवक हेमंत नाईक गावकर, नादीन फर्नांडिस, सायमन रिबेलो, कमलाकर म्हाळशी व अन्य उपस्थित होते. नियोजन व सांख्यिकी खात्याचे अधिकारी डॉ. कैलास गोखले यांनी स्वागत केले. विशांत गावकर यांनी आभार मानले.

Ramesh Tawadkar
AAP Goa: 'आप'ला राष्ट्रीय दर्जा मिळाल्याचा पालेकरांना आनंद; आपचे अस्तित्व सिद्ध

अन्न, कृषी उद्योगांना वाव

काणकोणात अन्न, कृषी उत्पादनावर आधारित उद्योगांना भरपूर वाव आहे. आपल्या अळंबी उत्पादन प्रकल्पात चार जागा रिकाम्या असून त्याच बीएससी ॲग्रीकल्चर, मायक्रोबायोलॉजी पदवीधर, पदवीधारकांना उद्यापासूनच नोकरीवर ठेवण्याची आपली तयारी असल्याची ऑफर झुआरी ॲग्रो फूड्‌सचे मालक डॉ. संगम कुराडे यांनी उपस्थित युवकांना दिली.

बेरोजगारांना रोजगाराची नामी संधी

लोकोत्सवात स्वयंपूर्ण युवा अंतर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात बेरोजगारांना रोजगार शोधण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे, असे मत चाररस्ता-काणकोण येथील एक बेरोजगार युवती सीमरन मुदगुळकर हिने सांगितले.

माझे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. वेर्णा येथील कॉमस्कॉप उद्योगात या मेळाव्यात मुलाखत दिली आहे आणि नोकरीची संधी मिळेल, असा विश्वास तिने व्यक्त केला.

Ramesh Tawadkar
Goa Wellness Tourism : आरोग्य क्षेत्रातही गोव्यात पर्यटन विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

ग्रामीण भागावर लक्ष

इंडियन टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पाडुरंग नाईक यांनी आतापर्यंत रोजगार मार्गदर्शनाची खरी गरज ग्रामीण भागातील शिक्षित युवकांना आहे हे हेरूनच असे रोजगार मेळावे ग्रामीण भागात आयोजित करण्यात येत आहेत, असे सांगितले.

रमेश तवडकर, सभापती-

युवकांच्या भवितव्यासाठी व्हिजन आणि मिशन 2030 अंतर्गत समाजातील शेवटच्या युवकाला जगण्याचे साधन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर आज रोजगार यात्रा भरविली आहे. या यात्रेत वेगवेगळ्या 39 कंपन्यांनी रोजगार उपलब्धतेची दालने खुली ठेवली आहेत. युवकांनी या सर्व दालनांत आपली मुलाखत देऊन आपली जागा निश्चित करावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com