Crime News Dainik gomantak
गोवा

Poll Duty Officers Arrested In Goa: निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्याने उकळले 16 लाख; गोव्यात दोन लुटारू अधिकाऱ्यांना अटक

Poll Duty Officers Arrested In Goa:या प्रकरणी तडकाफडकी कारवाई करताना दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी आश्विन चंद्रू यांनी त्‍या दोघांनाही निलंबित केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Poll Duty Officers Arrested In Goa

निवडणूक प्रक्रियेतील एका कर्मचाऱ्याने आपण आयकर विभागाचा अधिकारी असल्याची बतावणी करून दोघांकडून १६ लाखांची रक्कम उकळल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही बतावणी करणारा निवडणूक कामकाज कर्मचारी नितेश नाईक आणि त्याला नंतर या कृत्यात साथ देणारा भरारी पथकातील अधिकारी अनिरुद्ध पवार या दोघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्या दोघांविरोधात दाबोळी पोलिस स्थानकावर तक्रार नोंदविल्‍यानंतर त्‍यांना रात्री उशिरा अटक करण्‍यात आली.

या दोघांपैकी नितेश नाईक याने एक कार अडवून दोघांकडून १६ लाख रुपये जप्त केले आणि नंतर त्या ठिकाणी आलेला भरारी पथकातील अधिकारी अनिरुद्ध पवार याने ते पैसे सरकारी तिजोरीत जमा न करता परस्‍पर हडप केल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे.

या प्रकरणी तडकाफडकी कारवाई करताना दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी आश्विन चंद्रू यांनी त्‍या दोघांनाही निलंबित केले आहे. दरम्‍यान, या बनावट छापा प्रकरणाने राज्‍यात खळबळ माजली आहे.

अनिरुद्ध पवार हा मुरगाव पालिकेत अभियंता म्‍हणून काम करतो. त्याची भरारी पथकात नियुक्ती केली होती. तर, नितेश नाईक हा वास्‍को वीज खात्‍यात कनिष्‍ठ लिपिक म्‍हणून काम करतो.

निवडणूक आयोगाने मुरगाव तालुक्यासाठी स्थापलेल्या नियंत्रण कक्षात त्याची नेमणूक केली होती. ३१ मार्च रोजी नितेश नाईक याने दाबोळी विमानतळाजवळ अशोक चौधरी आणि पवनकुमार वर्मा या दोघांची गाडी अडवून त्‍यांच्‍याकडे असलेली १६ लाख रुपयांची रक्‍कम जप्‍त केली.

मात्र ही रक्‍कम जप्‍त केल्‍याचे कुठेही न दाखविता ती परस्‍पर हडपली असा संशय आहे. या कथित रेड प्रकरणानंतर चौधरी आणि वर्मा या दोघांनी पोलिस कंट्रोल रुमला फोनवरून यासंबंधीची माहिती दिली.

तेथील फोन सिस्‍टमवर रेकॉर्ड होतात. त्‍यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्‍यानंतर ३१ मार्च रोजी रात्री फ्‍लाईंग स्‍क्‍वॉडच्‍या ड्युटीवर असलेल्‍या अधिकाऱ्यांची चौकशी केली असता, अनिरुद्ध पवार व नितेश नाईक या दोघांची नावे पुढे आली.

वास्‍तविक नितेश नाईक याची ड्युटी फक्‍त कारकुनी स्वरूपाची होती. तरीसुद्धा त्‍याने पैसे जप्‍त करण्‍याच्‍या कारवाईत कसा भाग घेतला आणि जर अशी रक्‍कम जप्‍त केली तर त्‍याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना का दिली नाही, असे प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहेत.

दरम्‍यान, अनिरुद्ध पवार व नितेश नाईक या दोघांवर प्रश्‍‍नांचा भडिमार केला असता सुरूवातीला त्‍यांनी पैसे नव्‍हे तर दारू पकडली असे सांगण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यांच्‍या जबानीत वारंवार तफावत आढळून आल्‍यामुळे दोघांनाही निलंबित करून जिल्‍हाधिकारी कार्यालयाने चौकशी सुरू केली आहे.

नितेशला मित्राने दिली होती गुप्‍त माहिती

याप्रकरणी नितेशची चौकशी केली असता, त्‍याला त्यांचा मित्र चंदन याच्याकडून कोणीतरी मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन कारमधून निघाल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ३१ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास दाबोळी मतदारसंघातील ‘वालीस जंक्शन’ येथे त्याने संशयित वाहन अडवले आणि वास्को पोलिस स्थानकासमोर नेले.

मात्र, रोकड मिळाली नाही, असे सांगितले. नंतर त्याने उलटसुलट उत्तरे दिली. त्यातून तो खोटे बोलत असल्याचे स्‍पष्‍ट झाले.

निवडणूक कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र मागा

या घटनेच्या पार्श्वभूमीवर तपासणीसाठी येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची आधी ओळख पटवून घ्यावी असे आवाहन दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांनी केले आहे. निवडणूक कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे जनतेने मागावीत, असे आवाहन त्‍यांनी केले आहे.

अन्‌ प्रकरण असे झाले उघड!

३१ मार्चच्या रात्री उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडून दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना महत्त्वाची माहिती मिळाली होती. ही माहिती दाबोळीतील भरारी पथकाला कळविण्यात आली. २ एप्रिलला दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना उपरोक्त जप्तीबाबत प्राप्तिकर विभागाने कॉल केला.

जप्त करण्‍यात आलेल्‍या पैशांची स्थिती काय आहे, याची चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी संपूर्ण घटनेची माहिती दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. या दोघांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

मात्र, पैसे सापडले नाहीत. याच प्रकरणात अशोक चौधरी आणि पवनकुमार वर्मा यांनी भरारी पथकातील दोघांनी १६ लाख रुपये घेतल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yadava Dynasty Battle: चित्रप्रभू चालून गेला, अल्लाउद्दिनचे पुत्र ठार झाले! तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली; खिलजीची देवगिरीवर स्वारी

'गोव्याची प्रतिमा धोक्यात येतेय!', 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमाचे आयोजन; महिला मंचाचा कडक आक्षेप

Komanda Kurumba Prabhu: महाप्रलयानंतर देश एक विशाल अरण्य होता, जिथे जंगली प्राणी होते, मानववंश उदयास आला; संघटित, सभ्य 'कुरुंब'

कृत्रिम अति-विलंबामुळे, जमिनी परप्रांतीय माफियांच्या ताब्यात गेल्याने, गोव्याचा ‘सत्यानाश’ झाल्याचे चित्र वर्तमानकाळात स्पष्टपणे दिसते..

Butterflies In Goa: 'ताकदवान क्रूजर युद्धनौकांवरुन नाव दिलेले, गोव्यात सर्वत्र आढळणारे फुलपाखरु'; फुलपाखरांतील राजेशाही

SCROLL FOR NEXT