Goa ZP elections Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'मी चाललोय, काहीतरी रंजक घडेल!',आरजीच्या पाठोपाठ पालेकरांची दिल्लीवारी; Watch Video

Amit Palekar Delhi visit: 'आप'चे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनी 'दिल्लीला जात आहे, लवकरच काहीतरी मनोरंजक घडामोडी घडतील' असे सूचक विधान केले आहे

Akshata Chhatre

पणजी: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकारणातील महत्त्वाचे सूत्रधार आता दिल्लीच्या दिशेने लागले आहेत. 'आप'चे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनी 'दिल्लीला जात आहे, लवकरच काहीतरी मनोरंजक घडामोडी घडतील' असे सूचक विधान केले आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी रिव्होल्युशनरी गोअन्सचे आमदार वीरेश बोरकर आणि पक्षप्रमुख तुकाराम परब यांनी विमानातून 'सेल्फी' पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

"भाजपला हरवण्यासाठी जे आवश्यक ते करू"

'आप'चे अध्यक्ष अमित पालेकर यांनी 'आरजी'सोबतच्या संभाव्य युतीवर भाष्य करण्याचे टाळले. मात्र, भाजपला पराभूत करण्यासाठी पक्ष कोणतीही पाऊले उचलू शकतो, असे संकेत दिले. "सध्या तरी मला यावर कोणतीही टिप्पणी करायची नाही. गोव्यासाठी जे चांगले असेल आणि भाजपला पराभूत करण्यासाठी जे आवश्यक असेल, ते आम्ही नक्कीच करू. राजकारणात काहीही घडू शकते," असे सूचक विधान पालेकर यांनी केले आहे.

बोरकर-तुकाराम परब यांची 'दिल्ली-सेल्फी' आणि टीका

वीरेश बोरकर यांनी एकीकडे काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला झेडपी जागावाटपावर 'परिपक्वता' दाखवण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्याच वेळी त्यांनी पक्षप्रमुख तुकाराम परब यांच्यासह विमानातून 'सेल्फी' पोस्ट केल्याने ते राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले. या पोस्टमुळे विरोधी पक्षांमध्ये जागावाटपावर निर्णायक चर्चा आणि राजकीय वाटाघाटी करण्यासाठी ही दिल्ली भेट असल्याची अटकळ बांधली जात आहे.

या 'सेल्फी स्टंट'वर राजकीय विश्लेषकांनी टीका केली आहे. 'बाळबोध राजकीय वर्तन' आणि अनावश्यक नाट्यमयता म्हणून या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे. बोरकर यांनी जेव्हा काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाकडून गांभीर्याची मागणी केली आहे, तेव्हा त्यांच्याच या कृतीमुळे नेमका उलट संदेश गेला आहे, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. एकंदरीत, गोव्यातील विरोधी पक्षांमध्ये युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच, प्रमुख नेत्यांचे दिल्लीला जाणे प्रश्नचिन्ह बनलेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT