Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

Damu Naik remarks on Congress: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपच्या उमेदवार यादीची वाट पाहण्याची सावध रणनीती अवलंबली आहे.
Goa ZP elections
Goa ZP electionsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपच्या उमेदवार यादीची वाट पाहण्याची सावध रणनीती अवलंबली आहे. यावर भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी बुधवार (दि.२६) काँग्रेसला थेट उत्तर दिले, ते म्हणाले की, "जे लोक आम्हाला निर्देश देतायत, ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष नाहीत. जर त्यांना भाजपमध्ये यायचे असेल, तर आमचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत," असे म्हणत नाईक यांनी काँग्रेसच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे.

'विरोधक निराश होऊन बोलतात'

गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी जाहीर केले होते की, भाजपची यादी जाहीर झाल्याशिवाय काँग्रेस आपले उमेदवार घोषित करणार नाही. भाजपच्या 'खोडा घालणे' आणि 'शेवटच्या क्षणी रणनीती बदलणे' या सवयी टाळण्यासाठी ही रणनीती असल्याचे पाटकर यांनी म्हटले होते.

यावर प्रतिक्रिया देताना दामू नाईक म्हणाले की, "ते (काँग्रेस नेते) सातत्याने आमचे दरवाजे ठोठावत आहेत, इतर पक्षही तेच करतायत आणि जेव्हा त्यांना काही मिळत नाही, तेव्हा ते निराश होऊन टीका करतात. त्यांना बोलू द्या," असे नाईक यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले होते की, काँग्रेसचे मुख्य उद्दिष्ट भाजपचा पराभव करणे हे आहे आणि जर त्यांनी लवकर यादी जाहीर केली, तर भाजप लगेचच त्यांच्या उमेदवारांना लक्ष्य करेल.

Goa ZP elections
Goa Politics: "दाल में कुछ काला है!", सरदेसाईंचा भाजपवर हल्ला; विरोधी पक्षांना दिला '30-10-10'चा फॉर्म्युला

"आमची रणनीती कळेलच!"

काँग्रेसने भाजपच्या रणनीतीची प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतल्यावर, भाजपला 'त्यांची रणनीती कळेलच' असे काँग्रेसने म्हटले होते. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काँग्रेसच्या या वक्तव्याला फारसे महत्त्व दिले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com