Political Reservation Dainik Gomantak
गोवा

Political Reservation: ‘गाकुवे’ ने घेतली आरक्षणासाठी राज्यपालांची भेट

‘गाकुवे’ समाजाच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली.

दैनिक गोमन्तक

Political Reservation: ‘गाकुवे’ समाजाच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली. अनुसूचित जमातीसाठी राजकीय आरक्षण देण्यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली.

यावेळी राज्यपाल पिल्लई यांनी शिष्टमंडळाला गोव्यातील अनुसूचित जमातींना आरक्षणाचा लाभ भारतीय राज्यघटनेनुसार देण्याबाबतचा अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना विचार करण्यास सांगण्याचे आश्‍वासन दिले.

2003 साली गोव्यातील अनुसूचित जमातींची ​​लोकसंख्या 12.5 टक्के असल्याचे अधिसूचित करण्यात आले होते. हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

ज्यावेळी ही अधिसूचना जारी करण्यात आली. त्यावेळी परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि ते अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जागांचे आरक्षण यासाठी अहवाल तयार करत होते.

हा अहवाल 2008 मध्ये संसदेत मांडण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला. तथापि, गोव्यातील अनुसूचित जमातींना त्यांच्या राजकीय आरक्षणाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले.

गोव्यातील अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाला आवश्यक निर्देश जारी करण्याची विनंती यावेळी करण्यात आली.

राज्यपाल पिल्लई यांनी भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे सदस्य ॲड. जुआंव फर्नांडिस, रवींद्र वेळीप, रुपेश वेळीप, रामा काणकोणकर, फ्रान्सिस्को कुलासो, गोविंद शिरोडकर आणि जोसेफ वाझ यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT