Political News Dainik Gomantak
गोवा

रवी नाईक दुसऱ्या पक्षात गेल्‍याने काँग्रेसला फरक पडत नाही; गिरीश चोडणकर

रवी नाईक यांनी अनेक पक्ष बदलले. ते दुसऱ्या पक्षात गेल्‍याने काँग्रेसला काडीचाही फरक पडत नाही, अशा शब्‍दांत काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी संताप व्‍यक्त केला.

दैनिक गोमन्तक

Political News: काँग्रेस पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रतापसिंह राणे यांच्‍याशी रवी नाईक यांची तुलना होऊच शकत नाही. राणे गेली 45 वर्षे काँग्रेस (Congress) पक्षात आहेत. ते खरे निष्ठावंत काँग्रेसमन आहेत. याच्या उलट रवी नाईक यांनी अनेक पक्ष (Political Party) बदलले. गेल्या दीड वर्षांपासून काँग्रेसने त्‍यांच्‍याशी संबंधच तोडून टाकले होते. त्यामुळे ते दुसऱ्या पक्षात गेल्‍याने काँग्रेसला काडीचाही फरक पडत नाही, अशा शब्‍दांत काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी संताप व्‍यक्त केला.

सेक्‍स स्‍कँडलमध्‍ये गुंतलेल्‍या मंत्र्याचे (Ministers) नाव नक्कीच जाहीर करणार. आपण दिलेली पंधरा दिवसांची मुदत एकदा संपू दे, असा इशारा त्‍यांनी पुन्‍हा एकदा दिला.

शिरोडा येथील समाजसेवक अणि मगोचा युवा नेता स्नेहलो ग्रासियस यांनी आपल्‍या सुमारे 300 समर्थकांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्‍यानंतर चोडणकर बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते (Opposition Leader) दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, दक्षिण गोवा काँग्रेस समिती अध्यक्ष ज्यो डायस यांची उपस्थिती होती.

ग्रासियस यांच्या प्रवेशाने शिरोड्यात काँग्रेस पक्षाचे बळ आणखी वाढले आहे. आगामी निवडणुकीत (Election) येथे काँग्रेसचाच झेंडा फडकेल. राज्‍यात सध्‍या भाजपविरोधी जनमत असून काँग्रेसला मोठा पाठिंबा मिळत आहे. जेव्हा दिंगबर कामत यांचे मुख्यमंत्रीपद गेले तेव्हा गोव्याचे कर्ज ७ हजार कोटी होते. आता ते २६ हजार कोटींवर पोचले आहे. भाजप सरकारने गोव्याला (Goa) कंगाल बनविले आहे, असा आरोपही चोडणकर यांनी केला.

दिगंबर कामत म्‍हणाले की, काँग्रेस हा लोकांचा पक्ष आहे. जनतेच्या सुखदु:खात पक्ष सदैव सहभागी असतो. म्‍हणूनच आम्‍हाला सर्वत्र भरघोस पाठिंबा मिळत आहे. दरम्‍यान, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही यावेळी विचार मांडले.

मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍यावर भ्रष्‍टाचाराचे आरोप करणारे रवी नाईक आता त्‍यांनाच जाऊन मिळाले आहेत. ते काँग्रेसमधून गेले हे बरेच झाले. कारण आता युवकांना संधी मिळेल. निवडणुकीत काँग्रेसतर्फे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. याची सुरूवात आजपासूनच झाली आहे. पक्षातर्फे 36 ते 38 मतदारसंघांत उमेदवार उभे केले जातील. पैकी 25 ते 27 निश्र्चितच निवडून येतील.

- गिरीश चोडणकर, काँगेस प्रदेशाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT