Atal Setu  Dainik Gomantak
गोवा

अटल सेतूवर वाहनांच्या वेगावर ‘नजर’

आजपासून मोहीम; वाहन मालकांच्या पत्त्यावर येणार नोटीस

दैनिक गोमन्तक

पणजी : मांडवी पुलावरील वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आता वाहतूक पोलिसांनी अटल सेतूवरील भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्याची विशेष मोहीम आजपासून सुरू करणार आहे. कारवाईची नोटीस वाहन मालकांना त्यांच्या पत्त्यावर पाठवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दिली. (Police to inspect speed of vehicles on Atal Setu in Goa)

मांडवी नदीवरील महामार्गाला जोडणारा अटल सेतू या पुलावरील वाहनाची वेगमर्यादा 50 किलोमीटर असली तरी मात्र या पुलावरून धावणाऱ्या वाहनाचा वेग 80 किलोमीटरपेक्षा कमी नसतो. या पुलावर कारवाईसाठी वाहतूक पोलिस नसल्याने वाहन चालक फायदा उठवत वेगमर्यादेचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूने ‘स्पीडोमीटर’ उभे करून वाहनाचा वेग मोजला जाणार आहे. जे वाहन चालक 50 किमीहून अधिक वेगाने वाहन चालवतील त्याची नोंद होईल. संबंधित चालकांच्या घरी नोटीस पाठवली जाईल, असे अधीक्षक प्रभुदेसाई म्हणाले.

अटल सेतूवर निर्बंध

  • अटल सेतू पुलावर दुचाकी चालकांना जाण्यास बंदी आहे. चारचाकी वाहन पुलावर उभे करण्यासही बंदी आहे.

  • काहीजण वाहन उभे करून सेल्फी काढतात. या पुलावरून भरधाव वेगाने वाहने चालविली जात असल्याने अपघाताची शक्यता असते.

  • आता यापुढे अटल सेतूच्या दोन्ही बाजूने स्पीडोमीटर उभे करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या वेगावर नियंत्रण येईल.

  • यापूर्वी या पुलावर भरधाव वेगाने वाहने चालविल्याने पुलाच्या विभाजकाला धडक देण्याच्या तसेच पुलावरील वळणावर वाहनावरील नियंत्रण जाऊन वाहन उलटण्याच्या घटना घडल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT