Nigerian citizen arrested in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: हणजुण पोलिसांच्या धडक कारवाईत सव्वा लाखांचे ड्रग्ज जप्त

नायजेरियन (Nigerian) नागरिकाला राहत्या घरी छापा टाकून पोलिसांनी केली अटक.

दैनिक गोमन्तक

शिवोली: झोरवाडा-हणजुण (Bardez) येथील रोहीदास वळवईकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहाणार्या बेनार्ड न्वाचुक्वा कालीस्तुस (43) या नायजेरियन (Nigerian) नागरिकाची त्याच्या राहात्या  खोलीवर अचानक छापा टाकून झडती घेतली असतां त्याच्या ताब्यातील एक लाख तेवीस हजारांचा अमली पदार्थ (सायकोट्रोपीक- ड्रग एमडीएमए ) हणजुण पोलिसांकडून जप्त करण्यात आला. (Police seize Rs 1.5 lakh worth of drugs in Anjuna)

संशयित बेनार्ड कालीस्तुस याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार हणजुण पोलिसांकडून रितसर गुन्हां दाखल करण्यात आला असून सध्या त्याची रवानगी तीन दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून झालेल्या अटकेनंतर  संशयित आरोपीचा रक्तदाब खाली गेल्याने संध्याकाळी उशिरा  हणजुण पोलिसांकडून त्याला उपचारासाठी तात्काळ म्हापशाच्या जिल्हा इस्पीतळात दाखल करण्यात आल्याची माहिती निरीक्षक सुरज गांलस यांनी दिली.

दरम्यान, शनिवारी दुपारी एक ते संध्याकाळी साडेचार पर्यत घातलेल्या या छाप्यात हणजुण पोलिस स्थानकाचे उप-निरीक्षक महेश केरकर, हेड कॉन्स्टेबल शामसुंदर पार्सेकर, कॉन्स्टेबल राजेश गोकर्णकर, आवीर कळंगुटकर, सिद्धेश नाईक, स्नेहल मळीक, सुदेश केरकर, अनंत भाईडकर, तसेच महिला कॉन्स्टेबल दिवीया घाडी यांनी या कारवाईत भाग घेतला. पुढील तपास उत्तर गोवा अधिक्षक तसेच इतर वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली हणजुणचे निरीक्षक सुरज गांवस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Sudarsan Pattnaik: 'तर गोव्यात अनेक वाळू शिल्प कलाकार घडतील'! पद्मश्री सुदर्शननी केले गोवन संस्कृतीचे कौतुक, म्हणाले की..

Dream Meaning: मी रात्री गाढ झोपलो आणि.....नशीब!! स्वप्नं आपल्याला काही सांगू पाहतायत का?

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

SCROLL FOR NEXT