Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Theft: ७ महिन्यांत ७० चोऱ्या, ३० लाखांचे सोने; गोव्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mask Men Theft Case: राज्यात घरफोड्या व चोऱ्या करून धुमाकूळ घालणारा अट्टल चोर मास्कधारी मारियो बाप्तिस्ता याच्या टोळीने चोरलेले सुमारे ३० लाखांचे ४४२ ग्रॅम वितळविलेले सोने पोलिसांनी जप्त केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police Solves MASK MEN'S THEFT Case

पणजी: राज्यात घरफोड्या व चोऱ्या करून धुमाकूळ घालणारा अट्टल चोर मास्कधारी मारियो बाप्तिस्ता याच्या टोळीने चोरलेले सुमारे ३० लाखांचे ४४२ ग्रॅम वितळविलेले सोने पोलिसांनी जप्त केले आहे.

हे सोने या टोळीने मडगावमधील सराफ दीपक बांदोडकर आणि कारागीर समर पाल यांना विकले होते. मुख्य सूत्रधार मारियोने राज्यातील १९ चोऱ्यांची कबुली दिल्याने या प्रकरणांचा उलगडा झाला आहे. आणखी काही चोऱ्यांचा छडा लागण्याची शक्यता असून या टोळीने विकलेले १०० ग्रॅम सोने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

पोलिसांची तारेवरची कसरत

मारियोच्या टोळीचा राज्यातील विविध पोलिस स्थानकांच्या हद्दीतील १९ घरफोड्यांमध्ये हात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. यात पर्वरीतील ४, पणजीतील ४, आगशीतील २, म्हापशातील १, हणजुणेतील २, फोंडा ५ तर जुने गोवे पोलिस स्थानक हद्दीतील एका प्रकरणाचा समावेश आहे. या टोळीने आतापर्यंत कुठे कुठे चोऱ्या वा घरफोड्या केल्या हे त्यांनाच आठवण नाही. त्यामुळे या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

स्लायडिंग दारांमुळे काम सोपे

अट्टल चोर मारियो हा आलिशान घरे तसेच शक्यतो स्लायडिंगचे दरवाजे असलेले फ्लॅट लक्ष्य बनवित होता. हे गुन्हेगार लोखंडी सळीने सहजपणे स्लायडिंग दरवाजांचे लॉक उघडत आणि घरांमध्ये शिरत.

चौघांना अटक

७ महिन्यांमध्ये ७० चोऱ्या

बार्देश, तिसवाडी, फोंडा, मुरगावात धुमाकूळ

स्लायडिंग दारांचे बंगले, फ्लॅटस लक्ष्य

३० लाखांचे ४४२ ग्रॅम सोने हस्तगत

१०० ग्रॅम सोने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू

सूत्रधारासह चौघांना अटक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT