rave party dainik gomantak
गोवा

Vagator Rave Party: रेव्ह पार्टी उधळली; वागातोर येथे पोलिसांचा छापा

दोन संशयितांना केली अटक

दैनिक गोमन्तक

म्हापसा: वजरान वागातोर येथे अमलीपदार्थ विरोधात कारवाई करताना पोलिसांनी छापा टाकत संशयित क्लब मॅनेजर व एका पर्यटकाला अटक केली आहे. या छाप्यात पोलिसांनी मेॉन्फेटामाइन' हा अमलीपदार्थ जप्त केला आहे.

(Police raid rave party at Vagator, two arrested)

एएनसी व हणजुग पोलिसांनी संयुक्तरित्या 'क्लब 9 बार मिराज मध्ये ही कारवाई केली. यावेळी हणजूण पोलिसांनी क्लबमध्ये असलेला पर्यटक मिथुन गोपाल (२०, बंगलुरु) याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच पार्टी आयोजक तथा क्लब मॅनेजर मॅनेजर वेन डेव्हिसव एका पर्यटकाला अटक केली. केली. तसेच पार्टी आयोजक तथा क्लबचा मॅनेजर वेन डेव्हिस या संशयितास ही अटक केली आहे.

रेव्ह पार्टी म्हणजे काय ?

रेव्ह पार्ट्या सहसा अत्यंत गुप्त पद्धतीने आयोजित केल्या जातात कारण बहुतेक पार्ट्या बेकायदेशीर ड्रग्जंनी भरलेल्या असण्याची शक्यता असते. अशाप्रकारच्या पार्ट्या सहसा शहराबाहेर किंवा सिक्रेट पध्दतीने आयोजित केल्या जातात. रंगीबेरंगी दिवे, बेकायदेशीर ड्रग्स, असंगतपणे नाचणारे लोक बऱ्याचदा रेव्ह पार्ट्यांमध्ये दिसतात. काही लोक या पार्ट्यांमध्ये फक्त नाचण्यासाठी येतात, तर काही लोक ड्रग्ज घेऊन नाचण्यामध्ये गुंग असतात.

दरम्यान अशा पार्ट्यांमध्ये एन्ट्री करणे भरपूर महाग असले तरी अशा स्थितीत श्रीमंत लोक बहुतांश या पार्ट्यांमध्ये दिसतात. अशा पार्ट्यांमध्ये सामान्यत:हा वेस्टर्न म्यूझिक (Western Music) वाजवले जाते. या संगीतामध्ये मात्र संगीताचे बोल गायब असतात. ड्रग्स घेतल्यानंतर अशा गाण्यांवर ठेका धरुन लोक बेधुंद होऊन नाचतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT