CCTV In Panaji Porvorim  Dainik Goamantak
गोवा

Goa Traffic Case: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर, 10 दिवसांत 3522 प्रकरणे दाखल

उत्तर गोवा जिल्हा पोलीस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Case यंदाचा पर्यटन हंगामाला सुरुवात होतेय. आतापासूनच मोठ्या प्रमाणात देशी पर्यटकांनी गोव्यामध्ये येणे सुरू केलेले आहे. अनेक पर्यटक जोडपी रेंट अ कार अथवा दुचाक्या घेऊन किनारी भागात फिरणे पसंत करत असतात.

त्यासोबतच स्थानिकही कामानिमित्त चारचाकीतून प्रवास करत असतात. मात्र हे करत असताना बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.

या सगळ्याला आळा बसवण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा पोलीस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.

वाहतूक नियमाचे पालन न करता बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाईची मोहीम हाती घेतलीय. अलीकडेच पोलिसांनी राबवलेल्या एका मोहिमेत मोटार वाहन कायद्यांतर्गत 3522 प्रकरणे दाखल झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

सीट बेल्ट न वापराने, वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगात वाहन चालवणे, दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणे, सिग्नलचे उल्लंघन करणे या आणि अशा अनेक वाहतूक नियमांची पायमल्ली केल्याच्या कारणास्तव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

शहारनिहाय दाखल झालेली प्रकरणे -

पणजी 240, ओल्ड गोवा 181, आगाशी 196, म्हापसा 358, कोलवाल 438

हणजूण 265, पेडणे 175, मोपा 248, पर्वरी 167, कळंगुट 238

सालीगाव 338, डिचोली 449, वाळपई 229

या आकडेवारीवरून समजतं की, वाहतूक पोलीस रस्ते वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी याकरिता प्रयत्नशील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Goa News Live: जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

बाजारात नाताळची धूम! ख्रिसमस ट्री, सजावट साहित्याची खरेदी जोरात; ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर

SCROLL FOR NEXT