Goa Crime News: कामगाराने केले होते उद्योजकाच्या मुलाचे अपहरण, अकरा वर्षानंतर सर्वोच्च न्यायालय म्हणते...

या घटनेनंतर मडगावचे तत्कालिन निरीक्षक संतोष देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली होती.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News मालकाच्या मुलाचे फिल्मी स्टाईलने अपहरण करून त्याच्या वडिलांकडून खंडणी मागण्याच्या आरोपाखाली दोषी ठरल्यानंतर सत्र न्यायालयाने त्या दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेवर आज सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कमोर्तब केले.

आपल्या मालकावरील रागाचा वचपा त्याच्या मुलावर काढण्यासाठी साथीदाराच्या मदतीने कट रचून संबंधित मुलाचे शाळेतून अपहरण केल्याची घटना नोव्हेंबर २०११ रोजी मडगाव येथे घडली होती.

अपहरण केल्यावर रुपेश फाळकर आणि व्हिक्टर फर्नांडिस या आरोपींनी संबंधित मालकाकडे खंडणी देखील मागितली होती. या घटनेनंतर मडगावचे तत्कालिन निरीक्षक आणि विद्यमान उपअधीक्षक संतोष देसाई यांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठी महत्वाची कामगिरी बजावली होती. त्या गाडीचा पाठलाग करत फोंडा येथे पोलिसांनी अपहरणकर्त्यांना जेरबंद केले होते.

Goa Crime News
Mahadayi Water Dispute: 'आरजी'च्या पदयात्रेवर ठाणे पंचायतीचा आक्षेप, पोलिसांनी पदयात्रा रोखली

नंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यावर 25 साक्षीदार सादर करून आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाल्याने दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेवर प्रथम उच्च न्यायालयाने आणि आता सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कमोर्तब केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com