Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: पोलिसांची अकार्यक्षमता यांमुळे तरुण पिढी बरबाद: विजय सरदेसाई

दैनिक गोमन्तक

Goa Drug Case: ड्रग्स तस्करीप्रकरणी सोमवारी तिघांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गोव्यातून आणलेले 51 ग्रॅम कोकेन व 44 ग्रॅम वजनाच्या एमडीएमए गोळ्या जप्त केल्या असून त्याची किंमत सुमारे 97 हजार 500 रुपये आहे.

काही महिन्यांपूर्वी हैदराबादमध्ये ड्रग्सपुरवठा करणाऱ्या गोव्यातील काही विक्रेत्यांना तेथील पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची नावे लिंगमपल्ली अनुराधा (वय ३४ वर्षे), वेंकटा शिवा साई कुमार (वय ३३ वर्षे), सानिकोमू प्रभाकर रेड्डी (वय ३८ वर्षे) अशी आहेत.

अनुराधा हिची गोव्यातील काही ड्रग्स विक्रेत्यांशी ओळख होती. हैदराबादपेक्षा गोव्यात ड्रग्स स्वस्त असल्याने ती गोव्यातून ड्रग्स खरेदी करून हैदराबादमध्ये विकत होती. अनुराधाने आपल्या शेजारी राहाणाऱ्या नशेखोर तरुणाला ड्रग्स विकण्यास सुरुवात केली. नंतर तिने आपले जाळे हैदराबादमध्ये पसरवले.

‘त्या’ तिघांवर होती पोलिसांची बारीक नजर

ड्रग्सला हैदराबादमधील तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अनुराधा गोव्यात आली. तिने ड्रग्सच्या किमतींची माहिती मिळवली. नंतर तिने रेड्डी याच्याशी संपर्क साधून गोव्यातून ड्रग्सची तस्करी करण्याचा प्लॅन आखला.

एक त्रिकुट गोव्यातून ड्रग्स आणून हैदराबादमध्ये काही तरुणांना विकत असल्याची माहिती तेथील पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना या तिघांवर पाळत ठेवली. सोमवारी ते ड्रग्स विक्रीसाठी आले असता, हैदराबादमध्ये त्यांना अटक केली. मोकिला पोलिस स्थानकात या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

गोवा पोलिसांची अकार्यक्षमता उघड :

गोवा हे ड्रग्सचे केंद्र आहे, हे आता हैदराबाद पोलिसांच्या कारवाईने सिद्ध झाले आहे. यातून गोवा पोलिसांचा नाकर्तेपणा पुन्हा सिद्ध झाला आहे. सक्षम नेतृत्वाचा अभाव आणि पोलिसांची अकार्यक्षमता यांमुळे गोव्यात हा व्यवसाय फोफावत असून तरुण पिढी बरबाद होत आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ‘ट्विट’द्वारे केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT