School Hijab Row
School Hijab RowDainik Gomantak

School Hijab Row: ‘त्या’ विद्यार्थिनींना हिजाबाची कुणीही सक्‍ती केली नव्‍हती!

शाळेच्‍या प्राचार्यांचा खुलासा : मशिदीत प्रार्थना
Published on

वास्‍को येथील एका उच्‍च माध्‍यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दाबोळी येथील मशिदीमध्‍ये पाठवून त्‍यांना प्रार्थना करण्‍यास भाग पाडले, असा आरोप करून निलंबित केलेेले प्राचार्य शंकर गावकर यांनी या मशिदीत मुलांना मुस्‍लीम बांधव प्रार्थना कशी करतात, हे दाखविण्‍यात आले होते.

School Hijab Row
Goa News: ऐन सणासुदीच्या काळात सासष्टीत बहुतांश रेशन दुकानांत धान्यचा तुटवडा

त्‍यांच्‍यावर कुणीही प्रार्थना करण्‍यासाठी किंवा विद्यार्थिंनींना हिजाब घालण्‍याची सक्‍ती केली नव्‍हती, असा खुलासा केला आहे.

9 सप्‍टेंबर रोजी हे विद्यार्थी दाबोळी येथील मशिदीत गेले होते. त्‍यानंतर रविवारी एक व्‍हिडिओ व्‍हायरल झाला. त्‍यानंतर स्‍थानिकांनी हा ‘स्‍कूल जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप करून ते विद्यालयाच्‍या आवारात जमा झाले.

त्‍यानंतर यासाठी कारणीभूत असलेल्‍या प्राचार्यांना निलंबित करा, अशी मागणी लावून धरल्‍यानंतर शिक्षण खात्‍याने त्‍यांना सोमवारी त्‍वरित निलंबित केले.

यासंबंधी गावकर यांची बाजू समजून घेण्‍यासाठी त्‍यांच्‍याशी संपर्क साधला असता, विद्यार्थ्यांना सर्व धर्मांची जाणीव असावी आणि त्‍यांच्‍यामध्‍ये सर्वधर्म समभाव हे तत्त्व रुजावे, यासाठीच एका संघटनेच्‍या निमंत्रणानुसार २१ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना तेथे पाठविले होते. तेथेत सर्व धर्मांचे विद्यार्थी होते.

यापूर्वीही दोनवेळा आमचे विद्यार्थी मशिदीमध्ये गेले असून इतर धर्मांच्‍या विद्यार्थ्यांना आम्‍ही चर्च आणि मंदिरांमध्‍ये पाठविले आहे. यामागचे कारण इतर धर्मांचीही विद्यार्थ्यांना माहिती असावी, हे एकमेव कारण आहे.

९ सप्‍टेंबरला त्‍या मशिदीमध्‍ये गेलेल्‍या २१ पैकी फक्‍त तीन विद्यार्थिंनी होत्‍या. मुस्‍लीम धर्माची प्रार्थना कशी करतात, हे त्‍यांना त्‍यावेळी दाखविण्‍यात आले. मुस्‍लीम धर्मात प्रार्थना करताना डोक्‍यावर कापड घेण्‍याची प्रथा आहे.

या प्रथेनुसार त्‍या विद्यार्थिंनींनी तसे कापड घेतलेही असावे. मात्र, ते घेण्‍यासाठी त्‍यांच्‍यावर कुणीही सक्‍ती केली नव्‍हती.

माझे निलंबन बेकायदेशीर

माझ्यावर जी कारवाई झाली आहे, ती अन्‍यायकारक आहे. शिक्षकाला जर निलंबित करायचे असेल तर त्‍याला आधी कारणे दाखवा नोटीस जारी करावी लागते आणि स्‍पष्‍टीकरण न पटल्‍यास त्‍याच्‍यावर कारवाई होते. पण माझ्‍या बाबतीत अशी कोणतीही पद्धत वापरली गेली नाही. या प्रकारामुळे मी हताश झालो आहे, असे गावकर म्हणाले.

School Hijab Row
Caculo College : काकुलो कॉलेजला आयएसओ मानांकन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com