Goa police constable reinstated Dainik Gomantak
गोवा

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

Goa Police Constable: साक्षीदार विभागीय चौकशीत सहकार्य करणार नाहीत या कारणावर आधारित बडतर्फी हा कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आधार नाही. त्यामुळे मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचे ठरवत, बडतर्फी आदेश रद्द केला.

Sameer Panditrao

पणजी: १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलिस हवालदार कांचन चोडणकर पुन्हा सेवेत रुजू होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्यांच्या २००७ मधील निलंबन व सेवेतून बडतर्फीचे आदेश रद्द करत, गोवा सरकार व गोवा पोलिसांना एका आठवड्यात त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्याचे आदेश दिले आहेत.

चोडणकर यांना २००७ साली प्रथम निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हुंडाबळी, स्फोटकांचा बेकायदेशीर वापर, धमक्या व मारहाण या स्वरूपाच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांतील आरोपांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही विभागीय चौकशी न करता त्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती.

न्यायालयाने स्पष्ट केले की, साक्षीदार विभागीय चौकशीत सहकार्य करणार नाहीत या कारणावर आधारित बडतर्फी हा कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आधार नाही. त्यामुळे न्यायाच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन झाले असल्याचे ठरवत, न्यायालयाने बडतर्फी आदेश रद्द केला.

खंडपीठाने पोलिस विभागाला नवीन विभागीय चौकशी सुरू करण्याची मुभा दिली असून त्याचवेळी चोडणकर यांना तत्काळ सेवेत पुन्हा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT