Valpoi Siolim Tenant migrant workers Verification 
गोवा

गोव्यात 'कायदा सुव्यवस्था' राखण्यासाठी पोलिसांची दिवस-रात्र मेहनत; वाळपई, शिवोलीत 'पडताळणी मोहिम'

Valpoi Siolim Tenant Verification: वाढत्या चोऱ्या, दरोडे, खून आणि अन्‍य गुन्‍हेगारीचे प्रकार अलीकडच्‍या दिवसांत खूपच वाढले आहे. गुन्‍हे करून आरोपी आपल्‍या राज्‍यांत पळून जातात. या प्रकारांना आळा घालण्‍यासाठी आणि स्थानिकांमध्‍ये जागृती करण्‍याच्‍या हेतूने ही मोहीम हाती घेण्‍यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Siolim Tenant Migrant Workers Verification By Goa Police

शिवोली/वाळपई : वाढत्‍या गुन्‍हेगारीला आळा घालण्‍यासाठी पोलिसांनी गांभीर्याने पावले उचलण्‍यास सुरवात केली आहे. शिवोलीतही आज भाडेकरूंची पडताळणी मोहीम राबविण्‍यात आली. हणजूण पोलिसांनी शिवोलीत घरमालकांना भाडेकरू पडताळणी कागदपत्रांचे वाटप केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक तसेच कर्मचारी उपस्थित होते.

वाढत्या चोऱ्या, दरोडे, खून आणि अन्‍य गुन्‍हेगारीचे प्रकार अलीकडच्‍या दिवसांत खूपच वाढले आहे. गुन्‍हे करून आरोपी आपल्‍या राज्‍यांत पळून जातात. या प्रकारांना आळा घालण्‍यासाठी आणि स्थानिकांमध्‍ये जागृती करण्‍याच्‍या हेतूने ही मोहीम हाती घेण्‍यात आली आहे. त्‍यासाठी सर्वांनी सहकार्य करण्‍याचे आवाहन पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी केले आहे.

घरातील तसेच आस्थापनांतील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्यास वेळ न दवडता ते दुरुस्त करून घ्यावेत. पोलिस यंत्रणा आपल्या परीने कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहे. जनतेचेही सहकार्य आवश्‍‍यक आहे. वाढत्‍या गुन्‍हेगारीला आळा घालण्‍यासाठी ते आवश्‍‍यक आहे, असे आवाहन सूरज गावस यांनी केले.

राज्यात चोरीच्‍या घटनांसोबतच गुन्‍हे, रस्‍तेअपघातही वाढले आहेत. दाऊ पिऊन वाहन चालवणे आणि अपघात झाल्‍यानंतर पळून जाणे अशाही घटना उघडकीस आल्‍या आहेत. त्यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणा सतर्क बनली असून वाळपईत आज परप्रांतीय कामगारांची पडताळणी करण्‍यात आली.

पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळपई बाजारात जंक्शनवर ही मोहीम राबविण्‍यात आली. जवळपास ५२ कामगारांची सखोल माहिती घेण्‍यात आली. या जंक्शनवर दररोज सकाळी आठच्‍या सुमारास शेकडो कामगार दाखल होत असतात. जणू कामगारांची जत्राच भरते. प्रत्येकाच्या हातात जेवणाचे डबे, कामाचे साहित्य असते. हे कामगार कुठले, कुठे राहतात, काय काम करतात याची माहिती यावेळी घेण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ सत्रात मान्यवरांची ‘सेफ बॅटिंग’! 'पॉवर प्ले आहे पण..', भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT