गोव्यात भाडेकरु पडताळणी न करता राहणाऱ्या लोकांविरोधात गोवा पोलिसांनी मोहीम उघडली असून, याचाच एक म्हणून उत्तर गोव्यात भव्य भाडेकरु पडताळणी करण्यात आली. यावेळी सुमारे पाच हजार जणांची पडताळणी करण्यात आली त्यात सुमारे पाचशेजण विना कागदपत्राशिवाय आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
उत्तर गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात या वीकेंडला भाडेकरु पडताळणी मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक बीट त्यांच्या संबधित भागात तडताळणी करण्यासाठी रवाना करण्यात आले. या काळात सुमारे 300 जणांची पडताळणी करण्यात आली.
यात मालकाने भाडेकरुंचे पोलिस पडताळणी केलीय का? भाडेकरुंना देण्यात आलेली जागा कोणत्याही अवैध कामासाठी वापरली जातेय का? तसेच, समाजात काही चुकीची कामे करण्याच्या परराज्यातील वास्तव्य करणारी लोकं आहेत का? याची माहिती घेण्यात आली. यावेळी शंभर लोकांकडे वैध कागदपत्रे आढळली नाहीत. याप्रकरणी संबधित मालमत्ता मालकाविरोधात अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.
दरम्यान,उत्तर गोवा पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या भाडेकरु पडताळणी मोहिमेत सुमारे 500 जणांची पडताळणी केली. यात पाचशेजण विनाकागदपत्राशिवाय आढळून आलेत. या सर्वांच्या विरोधात कायेदशीर कारवाईची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.