Police Checking Goa Dainik Gomantak
गोवा

Goa : हणजुण पोलिसांकडून परप्रांतीय कामगारांची झाडाझडती

योग्य कागदपत्रांविना वास्तव्य करून राहाणाऱ्या 26 कामगारांना घेतले ताब्यात

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police : राज्यात गुन्हेंगारीची दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बार्देशातील विविध भागात वास्तव्य करून असलेल्या परप्रांतीय कामगारांची पोलिसांकडून कसून तपासणी सुरु आहे. याच मोहीमेचा भाग म्हणून गुरुवारी केलेल्या धडक कारवाईत इग्रजवाडा, मार्ना-शिवोली येथून 26 कामगारांना ताब्यात घेण्यात आले. संध्याकाळी उशिरा केलेल्या या कारवाईत हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रशाल देसाई आणि एकूण 15 पोलिस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

दरम्यान, यापुढेही अशाप्रकारची कारवाई सुरुच राहणार आहे. तसंच जे घरमालक जाणूनबुजून भाडेकरुंची माहिती लपवून ठेवतात त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक देसाई यांनी दिली.

कामगार वर्ग घरी परतण्याच्या वेळेत हणजूण पोलीस पथक शिवोली येथील सेंट अँथनी चर्च परिसरात दाखल झाले आणि तेथून त्यांनी मोठ्या प्रमाणात भाडेकरु कामगार वास्तव्य करुन राहाणाऱ्या एका भाडोत्री चाळीकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला. यावेळी उपस्थित 200 हून आधिक कामगारांची झाडाझडती तसेच त्यांच्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. यावेळी 26 कामगार योग्य कागदपत्रांविना याभागात वास्तव्य करून राहात असल्याचं आढळून आलं.

पोलिसांनी कागदपत्रांविना वास्तव्य करणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतलं. या सर्व कामगारांना हणजुणच्या पोलिस स्थानकात दाखल करण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. घरमालकांना  भाडेकरुंची माहिती पोलिसांना देण्याचे वारंवार सूचित करुनही अनेकजण याबाबत कानाडोळा करत असल्याने कडक कारवाईचे संकेत निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिले आहेत. या कारवाईत निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथक सहभागी झालं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT