Encroachment Goa : पर्रा-म्हापसा मार्गावरील अतिक्रमणावर धडक कारवाई!

राज्य सरकारने पर्रा ते म्हापसा दरम्यानच्या चौपदरी रस्त्याचे रूंदीकरणवजा पदपथाचे बांधकाम हाती घेतले आहे.
Encroachment Goa
Encroachment GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Encroachment Goa : पर्रा-म्हापसा मार्गावरील काणका येथे पदपथाच्या परिसरात अतिक्रमण केलेल्या कथित बांधकामांवर स्थानिक पंचायतीतर्फे गुरुवारी कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ही अतिक्रमणे येत्या 30 डिसेंबर 2022 पर्यंत हटविण्याचे निर्देश वेर्ला-काणका पंचायतीला दिलेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

राज्य सरकारने पर्रा ते म्हापसा दरम्यानच्या चौपदरी रस्त्याचे रूंदीकरणवजा पदपथाचे बांधकाम हाती घेतले आहे. वेर्ला-काणका पंचायत क्षेत्रातील हे काम 3.80 कोटी रूपये खर्चून साबांखातर्फे केले जात आहे. तर म्हापसा पालिका क्षेत्रातील कामावर 8.5 कोटी रूपये खर्च केले जात असून हे काम गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे हाती घेण्यात आले आहे. या रस्ता रूंदीकरणाला अडथळा ठरणारी बांधकामे हटविण्याचे निर्देश यापुर्वी गोवा खंडपीठाने दिले होते. त्यानुसार काणकातील तसेच म्हापसा पालिका क्षेत्रातील बांधकामे हटविण्यात आली होती. तरीही काही विक्रेत्यांनी या क्षेत्रात अतिक्रमण केल्यामुळे कंत्राटदाराला काम हाती घेणे शक्य होत नव्हते. याची दखल घेत खंडपीठाने वेर्ला काणका पंचायतीला हे अडथळे हटवण्यासाठी वरील मुदत दिली आहे.

Encroachment Goa
Morjim: हुल्लडबाजी भोवली; मोरजी किनाऱ्यावर चारचाकी घातल्याने पर्यटन विभाग अॅक्शन मोडमध्ये

पंचायत आणि साबांखाला या कारवाईमध्ये सहकार्य करण्याचे निर्देशही खंडपीठाने पोलिसांना दिलेले आहेत. शिवाय बोडगेश्वर मंदिरसमोरील साकवाखालील जलवाहिन्या स्थलांतर करण्याची सूचना जीटीडीसीला करण्यात आली आहे. त्यानुसार महामंडळाकडून हे काम होणार आहे, असे आमदार लोबो यांनी सांगितले. 

गुरुवारी सकाळी वेर्ला काणका पंचायतीने रस्ता रूंदीकरणातील अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात कारवाई मोहिम हाती घेतली. यावेळी कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि वेर्ला काणका पंचायतीचे पंच सदस्य उपस्थित होते. आमदार मायकल लोबो म्हणाले, या रस्त्याच्या बांधकामावर खंडपीठाने देखरेख ठेवली आहे. रस्त्यावर लोक अतिक्रमण करतात, या कारणास्तव पंचायतीला खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करावे लागत आहे. त्यामुळे ही अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mapusa Bill Dispute Violence
Mapusa Market Nullah Cleaning
Goa High Court POCSO ruling
Mapusa Market Security Action Plan
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com