Gomantak Photographer Sandeep desai arrest Dainik Gomantak
गोवा

मयेतील आंदोलनाचे चित्रिकरण करणाऱ्या 'गोमन्तक'च्या प्रतिनिधीला अटक

अटकेनंतर 4 तास उलटूनही साधं पाणीही न दिल्याने आंदोलकांचे हाल, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

दैनिक गोमन्तक

डिचोली : मयेमध्ये झालेल्या खाण वाहतूक विरोधी आंदोलनावेळी दैनिक गोमन्तकचे छायाचित्रकार संदीप देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आंदोलनावेळी फोटो आणि व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी पोलिसांनी संदीप देसाई यांना अटक केल्याची माहिती आहे. मात्र देसाई यांना झालेल्या अटकेचे आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. केवळ आंदोलनाचे व्हिडीओ शूटिंग केल्यामुळे संदीप देसाईंना अटक केल्याने पोलिसांच्या कारवाईवर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत

मयेमध्ये मायनिंगविरोधी (Mining) आंदोलनाला बुधवारी दुपारी वेगळेच वळण मिळाले. आंदोलक आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने अखेर स्थानिक सरपंचांसह छायाचित्रकार तसेच काही नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. धूळ प्रदूषण आणि बेदरकार खनिज वाहतुकीने त्रस्त बनलेल्या मयेतील स्थानिकांनी बुधवारी सकाळी खनिज वाहतूक रोखून धरली होती. मात्र ताब्यात घेतल्यानंतर 4 तास उलटूनही त्यांना ना काही खाण्यास दिलं ना पिण्यास पाणी. त्यामुळे संदीप देसाईंसह अटकेतील अन्य कार्यकर्त्यांचे चांगलेच हाल झाल्याची माहिती आहे.

दरम्यान अटकेतील (Arrest) सर्व कार्यकर्ते आणि दैनिक गोमन्तकचे छायाचित्रकार संदीप देसाई यांना उपजिल्हाधिकारी कार्यालयात जामिनासाठी आणण्यात आलं आहे. मात्र तासभर उलटूनही उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने आंदोलकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी मयेत (Mayem) आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. मात्र बराचवेळ चर्चा करूनही तोडगा निघत नसल्याने आणि नागरिक आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते. धूळ प्रदूषण टाळण्यासाठी अगोदर रस्ते पाण्याने भिजवा. पाण्याची समस्या दूर करा, अशी मागणी आंदोलकांनी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! सुपरमार्केटमध्ये पिशवी घेवून गेला अन्…. Viral Video एकदा बघाच

अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

बहिणीच्या छातीवर बुक्की मारली, आमची लायकी काढली; मुंबईतील 13 पर्यटकांना लुथरा बंधुंच्या कल्बमध्ये मारहाण, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

अग्रलेख: ‘आत्मघाती’ पळवाटा कशा थांबवायच्या? कमी गुण मिळाल्याने मुलांनी संपवले जीवन; पालक, शिक्षक अन् समाजासाठी धोक्याची घंटा

Verna Fire : गोव्यात 'आगीचं सत्र' सुरूच! हडफडे घटनेची धग कायम असतानाच, वेर्णा येथील भंगारअड्ड्याला भीषण; कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT